पतीच्या मित्रासोबत विवाहबाह्य संबंध, बोभाटा होताच नवऱ्याची हत्या, वर्ध्यात विवाहिता-प्रियकर आणि भाचा अटकेत

दीपाली आणि प्रियकर शुभम हे दोघे आर्वी येथे काही महिने सोबत राहिले. भाड्याच्या खोलीत ते बहीण-भाऊ असल्याचा बनाव करत राहत होते. शिक्षणानिमित्त आपण एकत्र राहत असल्याचं त्यांनी घरमालकाला सांगितलं होतं, मात्र त्यांच्यात बहीण-भावाचं नातं नसल्याचे घरमालकाने ताडलं आणि त्यांनी तातडीने रुम रिकामी करण्यास सांगितलं

पतीच्या मित्रासोबत विवाहबाह्य संबंध, बोभाटा होताच नवऱ्याची हत्या, वर्ध्यात विवाहिता-प्रियकर आणि भाचा अटकेत
वर्ध्याच्या जगदिश देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी शुभम जाधव
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 6:49 AM

वर्धा : वर्धा शहरातील नवीन आष्टी परिसरात राहणाऱ्या जगदीश देशमुख याची बेदम मारहाण करत गळा चिरुन हत्या (Wardha Crime) करण्यात आली. यानंतर मृतदेह गोणीत भरुन रस्त्यावर फेकून देण्यात आला होता. या प्रकरणी जगदीशची (Jagdish Deshmukh Murder) पत्नी दीपाली देशमुख, तिचा प्रियकर शुभम जाधव आणि त्यांना मदत करणारा शुभमचा भाचा विजय माने अशा तिघा जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर 11 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. जगदीशची हत्या (Murder) करून मृतदेह अप्पर वर्धा धरणात फेकण्याचा प्लॅन होता, मात्र वाटेत पोलीस गस्त घालत असल्यामुळे त्यांची योजना फसली आणि त्यांना मृतदेह रस्त्यात टाकून पळ काढण्याशिवाय पर्याय उरला नाही.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, मयत जगदीश देशमुख (वय 35) याचे आरोपी शुभम जाधव याच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. शुभम हा दीपालीला भेटण्याच्या बहाण्याने जगदीशच्या घरी येण्याचा प्रयत्न करायचा. काही दिवसांनंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. यावरुन शुभम आणि जगदीशमध्ये वाद झाला होता. जगदीशच्या आईलाही याची कुणकुण लागली होती. त्यांनी ही गोष्ट जगदीशच्या बहिणीच्या कानावर घातली होती. यामुळे पोलिसात तक्रार करणार असल्याची चर्चा होती.

बहीण-भाऊ असल्याचा बनाव

दीपाली आणि प्रियकर शुभम हे दोघे आर्वी येथे काही महिने सोबत राहिले. भाड्याच्या खोलीत ते बहीण-भाऊ असल्याचा बनाव करत राहत होते. शिक्षणानिमित्त आपण एकत्र राहत असल्याचं त्यांनी घरमालकाला सांगितलं होतं, मात्र त्यांच्यात बहीण-भावाचं नातं नसल्याचे घरमालकाने ताडलं आणि त्यांनी तातडीने रुम रिकामी करण्यास सांगितलं. त्यानंतर दीपाली पुन्हा आष्टीला येऊन जगदीशकडे राहू लागली.

दरम्यानच्या काळात जगदीशच्या आईची तब्येत बिघडल्याने तिने अंथरुण धरले. याचा फायदा घेत जगदीशची पत्नी दीपाली, तिचा प्रियकर शुभम जाधव यांनी जगदीशच्या हत्येचा कट रचला होता. शुभमने त्याचा भाचा विजय माने यालाही हत्येच्या कटात सहभागी करुन घेतले.

अप्पर वर्धा धरणात मृतदेह फेकण्याचा प्लॅन

नियोजनानुसार तीन फेब्रुवारीच्या रात्री जगदीशची हत्या करण्यात आली. विजय माने याने दिलेल्या माहितीनुसार, जगदीशची हत्या करून मृतदेह अप्पर वर्धा धरणात फेकण्याचा प्लॅन होता. जगदीशचा मृतदेह पोत्यात भरल्यानंतर मामा-भाचा आणि दीपाली हे पोते घेऊन अप्पर वर्धा धरणाच्या दिशेने जात होते. मात्र परिसरात पोलीस गस्त घालत होते. यामुळे जगदीशचा मृतदेह वाटेत फेकण्याशिवाय त्याच्याकडे गत्यंतर नव्हते. मृतदेह रस्त्यावर फेकून तिघे लपून बसले होते आणि पोलिस निघण्याची वाट पाहत होते. काही वेळाने दिवस उजाडल्याने फिरायला आलेल्या नागरिकांना जगदिश रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृताची ओळख पटताच पत्नी दीपाली तिथे पोहोचून आक्रोश करत होती. फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने घटनास्थळी तपासणी केली असता संशयास्पद गोष्टी सापडल्या. त्यानुसार पत्नी दीपालीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तिने खुनाची कबुली दिली. प्रियकर शुभम जाधवचे नाव समोर येताच त्यालाही अटक करण्यात आली. तसेच खून केल्यानंतर मृतदेह अप्पर वर्धा धरणात फेकण्याचा सल्ला विजय माने याने दिला होता. तिसरा आरोपी म्हणून पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना आष्टी न्यायालयात हजर केले असता 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

खून झाला त्यावेळी मृत जगदीशचा चार वर्षांचा मुलगा घरात होता. तर 8 वर्षीय मुलगी आजीच्या घरी गेली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन वडोरकर, शेख नबी करत आहेत.

संबंधित बातम्या :

ब्रेकअपनंतरही तिला लग्न करायचं होतं, पण त्याच्या मनात…. मुंबईतील 28 वर्षीय तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं

30 वर्षांच्या विवाहितेसह चार लहान मुलांची अमानुष हत्या, शेजारच्या घरालाही कळलं नाही, रात्रीच्या अंधारात असं काय घडलं?

वडिलांमुळे आईने आत्महत्या केल्याचा राग, औरंगाबादेत 24 वर्षीय मुलाकडून बापाची हत्या

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.