समाजाला जागृत करणाऱ्या जबाबदार व्यक्तीकडूनच संतापजनक कृत्य, अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकल्यावर अनैर्सिक बलात्कार

विकृतीला जात-पात, धर्म नसतो. पण विकृती कोणत्या टोकाची असू शकते याची देखील आपण कल्पना करु शकत नाही. कारण वर्ध्यात प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे एका जबाबदार व्यक्तीकडून संबंधित कृत्य घडलं आहे.

समाजाला जागृत करणाऱ्या जबाबदार व्यक्तीकडूनच संतापजनक कृत्य, अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकल्यावर अनैर्सिक बलात्कार
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 7:57 PM

वर्धा : विकृतीला जात-पात, धर्म नसतो. पण विकृती कोणत्या टोकाची असू शकते याची देखील आपण कल्पना करु शकत नाही. कारण वर्ध्यात प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे एका जबाबदार व्यक्तीकडून संबंधित कृत्य घडलं आहे. समाजातील जबाबदार व्यक्तीकडून अशाप्रकारचं कृत्य घडणं हे आपण कधीही अपेक्षित करु शकत नाही. पण वर्ध्यात तशी घटना घडली आहे. वर्ध्यात एका मौलानाने शरमेने मान खाली घालवणारं कृत्य केलं आहे. या मौलानाने अवघ्या 6 वर्षाच्या मुलावर अनैर्सिक बलात्कार केला आहे. त्यामुळे आता आपली वाटचाल नेमकी कोणत्या दिशेला होतेय? असा प्रश्न उपस्थित होतोय.

संबंधित घटना ही मंगळवारी (19 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान असं 25 वर्षीय आरोपी मौलानाचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मौलाना विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित घटना उघड झाल्यानंतर वर्ध्यात एकच खळबळ उडाली. मौलाना एका 6 वर्षीय चिमुकल्यासोबत इतकं अनैसर्गिक आणि अमानुष कृत्य कसं करु शकतो? असा प्रश्न उपस्थित करुन नागरिकांकडून रोष व्यक्त केला जातोय. तसेच मुस्लीम समाजाकडूनही या प्रकरणावर तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात येतोय.

नेमकं काय घडलं?

आरोपी मौलानाने 6 वर्षीय चिमुकल्याला सकाळी दहा वाजेच्या सुमारास एकटं बघितलं. यावेळी तो पीडित मुलाला गोड बोलून एका खोलीत घेऊन गेला. त्याने आजूबाजूला कुणी नाही ना याची शहानिशा केली. त्यानंतर त्याने चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. यावेळी मुलगा सुटकेसाठी आक्रोश करत होता. पण त्याला वाचविण्यासाठी तिथे कुणीही पोहोचू शकलं नाही. अत्याचारानंतर आरोपीने चिमुकल्याला दमदाटी करुन तिथून हाकलून दिलं.

पीडित चिमुकल्याने आई-वडिलांना सांगितलं

आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार मुलाने घरी जावून आपल्या आई-वडिलांना सांगितला. आपल्या मुलासोबत झालेला हा प्रकार समजल्यानंतर पीडित मुलाच्या आई-वडिलांचा संतापाचा पारा चढला. पीडित मुलाच्या आईने तातडीने आर्वी नाका चौकात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना संबंध प्रकार सांगितला. त्यांनी महिलेला रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार महिला रामनगर पोलीस ठाण्यात गेली. तिथे तिने आपल्या मुलासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. रामनगर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आरोपीचा शोध सुरु केला. अखेर पोलिसांनी आरोपी मौलाना समीउल्ला याला बेड्या ठोकल्या.

आरोपी मौलाना दोन वर्षांपासून वर्ध्यात वास्तव्यात

पोलीस आरोपीची सविस्तर माहिती गोळा करत आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी विरोधात महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आरोपी मौलाना हा गेल्या दोन वर्षांपासून वर्ध्यात वास्तव्यास आहे. त्याचं शिक्षण सुरत येथील जामिया इस्लामिया अरबी मदरसातून पूर्ण झालं आहे, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

मुंबईत ‘सेक्स टुरिझम रॅकेट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; दोन महिला दलालांना अटक

पापाचा घडा भरला, राजस्थानातून मुंबईत 21 कोटींच्या हिरॉईनची स्मगलिंग, मुंबईतील टॉप ड्रग्ज पेडलर महिला अखेर जायबंद

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.