पक्षांना दाणे टाकणाऱ्याचा 50 लाख लुटण्याचा प्रयत्न, अल्पवयीनसह दोघांना अटक

एका ऑटोमोबाइल्स शॉपच्या मालकाच्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकावत, तिला घरच्यांच्या हत्येचा धाक दाखवत घरातून 50 लाख आणण्याची मागणी करण्यात आली. मात्र, कुटुंबाच्या सतर्कतेने आणि पोलिसांच्या तात्काळ कारवाईने एक मोठी घटना टळली. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह दोघांना अटक केलीये (Nagpur Crime Pachpavli Police Arrest Two Who Are Trying To Rob 50 Lakhs).

पक्षांना दाणे टाकणाऱ्याचा 50 लाख लुटण्याचा प्रयत्न, अल्पवयीनसह दोघांना अटक
Pachpavli Police Station
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 10:36 AM

नागपूर : नागपूरमध्ये गुन्हेगारी थांबताथांबत नसल्याचं दिसत असून पोलिसांचे वचक गुन्हेगारांवर नाही का, असा प्रश्न निर्माण होतोय. नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एका ऑटोमोबाइल्स शॉपच्या मालकाच्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकावत, तिला घरच्यांच्या हत्येचा धाक दाखवत घरातून 50 लाख आणण्याची मागणी करण्यात आली. मात्र, कुटुंबाच्या सतर्कतेने आणि पोलिसांच्या तात्काळ कारवाईने एक मोठी घटना टळली. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह दोघांना अटक केलीये (Nagpur Crime Pachpavli Police Arrest Two Who Are Trying To Rob 50 Lakhs).

नेमकं काय घडलं?

मो नईम अशरफ अब्दुल जब्बार हे पाचपावलीतील सिद्धार्थनगरात राहतात. त्यांचे गंगाबाई घाट मार्गावर ऑटोमोबाइल्स शॉप आहे. आर्थिक स्थिती चांगली असलेल्या नईम यांच्याकडे पक्षांना दाणे टाकण्यासाठी एक 17 वर्षीय नोकर होता.

महिनाभर काम करून त्याने तेथून काम सोडले. नईम यांची आर्थिक स्थिती भक्कम असून घरात मोठ्या प्रमाणात रोख आणि दागिने असते, याची त्याला कल्पना आली होती. त्यामुळे त्याने आपल्या दोन साथीदारांसह नईम यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा कट रचला.

12 वर्षीय मुलीला धमकावले

नईम यांची 12 वर्षीय मुलगी आपल्या निवासस्थानापासून एका इमारतीपलीकडे रोज रात्री मेहंदी क्लासला जाते. ती मेहंदी क्लास संपवून घरी परत जात असताना अल्पवयीन आरोपी तसेच मोहम्मद जाहिद मोहम्मद राजिक आणि अन्य एका साथीदाराने तिला घराच्या बाजूला असलेल्या कारमागे ओढत नेले. तेथे तिचे हातपाय बांधले आणि गळ्याला चाकू लावला. तुझ्या घरी मोठ्या प्रमाणात रक्कम आणि दागिने आहेत. आम्हाला चूपचाप 50 लाख रुपये आणून दे, अन्यथा तुझ्या आईवडील आणि भावाला जीवे मारु, अशी धमकी त्यांनी दिली. याबाबत कुणाला काही सांगितले तर गंभीर परिणाम होतील, असेही आरोपींनी म्हटले. त्यानंतर आरोपी पळून गेले.

आरोपींनी केलेली मागणी पूर्ण केली नाही आणि त्याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर आपल्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका होईल, असा धाक मनात बसल्याने मुलगी कमालीची घाबरली होती. तिचे वर्तन कळण्यापलीकडे होते. ती घरात विचित्र वर्तन करु लागल्याने घरची मंडळी अस्वस्थ झाली. त्यांनी तिला विश्वासात घेऊन बोलते केले. तेव्हा तिने वडिलांना बिलगून रडत रडत घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून नईम आणि त्यांचे कुटुंबीयही हादरले.

पाचपावली पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत लगेच गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुख्य अल्पवयीन आरोपी आणि मोहम्मद जाहिद नामक आरोपीच्या मध्यरात्री समुसक्या आवळल्या. त्यांचा तिसरा साथीदार सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत

Nagpur Crime Pachpavli Police Arrest Two Who Are Trying To Rob 50 Lakhs

संबंधित बातम्या :

कारच्या सीटखालून 70 किलो गांजाची तस्करी, यूपीच्या आरोपीला नागपुरात अटक

सीबीआयच्या हाती सुपारी व्यापाऱ्यांची जंत्री, संत्रीनगरीत छापेमारी, 15 हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय

'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी.
'या' 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा EVMवर संशय अन्..
'या' 24 उमेदवारांचा EVM पडताळणीसाठी अर्ज; उमेदवारांचा EVMवर संशय अन्...
'संजय राऊत मेंटल, पागल... त्याच्या हातात दगडं द्या अन् फिर म्हणा...'
'संजय राऊत मेंटल, पागल... त्याच्या हातात दगडं द्या अन् फिर म्हणा...'.
...म्हणून महायुतीचा विजय, आय एम अल्सो इंजिनिअर; जानकरांचं मोठं वक्तव्य
...म्हणून महायुतीचा विजय, आय एम अल्सो इंजिनिअर; जानकरांचं मोठं वक्तव्य.
'काळजीवाहू मुख्यमंत्री खचले, चेहऱ्यावर हास्य नाही, त्यांचा चेहरा...'
'काळजीवाहू मुख्यमंत्री खचले, चेहऱ्यावर हास्य नाही, त्यांचा चेहरा...'.
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले,
मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले,.
'जे चाललंय ते...', महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून पवारांचा हल्लाबोल
'जे चाललंय ते...', महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून पवारांचा हल्लाबोल.
मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होणार, काय आहे मोठी बातमी?
मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होणार, काय आहे मोठी बातमी?.
उद्या लोकलने प्रवास करणार आहात? मग हा व्हिडीओ बघा, कसा असणार मेगाब्लॉक
उद्या लोकलने प्रवास करणार आहात? मग हा व्हिडीओ बघा, कसा असणार मेगाब्लॉक.
डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली तरूणी अन्... काय घडलं? बीडमध्ये बंदची हाक
डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली तरूणी अन्... काय घडलं? बीडमध्ये बंदची हाक.