हिरे खोटे असल्याचे समजून फेकून दिले, अटकेनंतर चोरट्यांना खरी किंमत समजली अन्…

चोरट्यांनी साडे आठ लाख रुपयांचे हिरे बनावट खोटे असल्याचे समजून ते चक्क फेकून दिले आहेत. ही घटना नागपुरात घडली असून हिरे फेकून देऊन त्यांनी सोने लपवून ठेवले होते. सध्या या आरोपींना अटक करण्यात आलं आहे.

हिरे खोटे असल्याचे समजून फेकून दिले, अटकेनंतर चोरट्यांना खरी किंमत समजली अन्...
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 11:50 PM

नागपूर : गुन्हेगारी विश्व जेवढं वाईट आहे तेवढेच थरारक आणि मोठे गुन्हे करणारे लोकदेखील आहेत. कधी एखादा गुन्हेगार काय आणि कसा गुन्हा करणार हे सांगता येत नाही. काही गुन्हेगारी कृत्यांची कहाणी ऐकूण आपल्या अंगावर काटा उभा राहतो. सध्या मात्र एका वेगळ्याच चोरीची चर्चा होत आहे. चोरट्यांनी साडे आठ लाख रुपयांचे हिरे खोटे असल्याचे समजून ते चक्क फेकून दिले आहेत. ही घटना नागपुरात घडली असून हिरे फेकून देऊन त्यांनी सोने लपवून ठेवले होते. सध्या या आरोपींना अटक करण्यात आलं आहे. त्यांच्या या अज्ञानाची सगळीकडे चर्चा होत आहे.

नेमका प्रकार काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार नयनमुनी मेधी, दिपज्योती मेधी आणि संजू राय या तीन चोरट्यांनी 10 ऑगस्ट रोजी हावडा – मुंबई गीतांजली एक्स्प्रेसमध्ये गोंदिया या भागात महिलांची पर्स चोरली होती. या चोरट्यांनी दोन महिलांना लुटले होते. यामध्ये एका पर्समध्ये साधारण 19 लाख रुपयांचे सोने तसेच हिरेजडित दागिने होते. तसेच दुसऱ्या महिलेच्या पर्समध्ये 82 हजार रुपये होते. ऐवढा ऐवज चोरून चोटरे फरार झाले होते.

रोख रक्कम वाटून घेतली, हिरे फेकून दिले

मोठा हात मारल्यानंतर या तिन्ही चोरट्यांनी लुटलेली रक्कम आपसात वाटून घेतली. तसेच सोन्यच्या बांगड्या आणि दागिने सोनाराच्या मदतीने वितळूवन घेतले. दागिन्यांसोबतच त्यांनी हिरे वितळवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात यश न मिळाल्यामुळे ते शेवटी फेकून दिले. फेकून दिलेल्या हिऱ्यांची किंमत तब्बल आठ लाख रुपये असल्याची कल्पनादेखील या चोरट्यांनना नव्हती.

पोलिसांनी झर्वेशन चार्ट, सीसीटीव्ही फुटेज तपासले

तीन आरोपींची ही आतंरराज्यीय टोळी रेल्वे प्रवाशांची लूटमार करायची. रिझर्वेशन करुन ते बाकीच्या प्रवासांचे दागिने तसेच पैशांची चोरी करत असत. दोन महिलांना लूटन त्यांनी आसाम राज्यात पळ काढला होता. मात्र नागपूर लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा तपास मोठ्या गांभिर्याने करत होते. त्यांनी रिझर्वेशन चार्ट, सीसीटीव्ही फुटेज, गोंदिया, नागपूर, दुर्गसह अनेक रेल्वेस्थानकांवर चौकसी केली. तपासानंतर पोलिसांना या आरोपींचा सुगावा लागला.

हिरे खोटे वाटल्यामुळे फेकून दिले

नागपूर लोहमार्ग पोलिसांनी आसामला जाऊन या तिन्ही भामट्यांना अटक केलं. त्यांच्याकडून पोलिसांनी 10 लाख 60 हजार रुपयांचे सोने जप्त केले आहे. पण चोरट्यांनी फेकून दिलेले हिरेजडित दागिने पोलिसांना सापडू शकलेले नाहीत. हिरे खोटे आहेत असे वाटल्यामुळे आम्ही ते फेकून दिले अशी कबुली चोरट्यांनी दिली आहे.

इतर बातम्या :

Prabhakar Sail | प्रभाकर साईल यांना एनसीबीकडून समन्स, वानखेडेंवर केलेल्या आरोपानंतर चौकशी होणार

भरती प्रक्रियेत पुन्हा गोंधळ, हॉलतिकीट ग्राह्य न धरण्याचे विद्यार्थ्यांना मेसेज, न्यासा कंपनीविरोधात तक्रार दाखल

Aryan Khan Bail | मोठी बातमी ! आर्यन खानच्या जामिनावरची आजची सुनावणी स्थगित, उद्या पुन्हा युक्तिवाद होणार

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.