पुण्यानंतर नागपुरात ‘हिट अँड रन’, मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवले

Nagpur Dunk And Drive: पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने गाडीत बसलेल्या तिन्ही आरोपींना अटक केली. त्यात कारचालक आणि कारमध्ये बसलेले तिघांनी दारूचे सेवन केल्याचा संशय असून पोलिसांनी त्यांना मेडिकलसाठी पाठवले आहे.

पुण्यानंतर नागपुरात 'हिट अँड रन', मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवले
नागपुरात अपघातानंतर जमावाने गाडीची तोडफोड केली.
Follow us
| Updated on: May 25, 2024 | 10:33 AM

पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरण ताजे असताना नागपुरात रात्री मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवल्याची घटना घडली आहे. नागपूर पोलिसांनी या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले त्यात एक महिला, एक पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे. पुण्यातील प्रकरणानंतर पोलिसांवर झालेल्या टीकेनंतर काळजी घेऊन नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या प्रकरणात आरोपींना जामीन मिळू नये यासाठी पावले उचलली आहे.

गांजा, दारु जप्त

नागपुरात झेंडा चौकामध्ये शुक्रवारी रात्री ‘हिट अँड रन’ची घटना घडलेली आहे. दारू आणि गांजा सेवन करून बेदारकपणे वाहन चालवणाऱ्यांनी पायी जाणाऱ्या तिघांना उडवला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तिन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये 32 ग्राम गांजा जप्त केला. त्यात दोन विदेशी दारूच्या दोन बॉटल मिळून आल्या आहेत. लोकांनी या तरुणाला बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने गाडीत बसलेल्या तिन्ही आरोपींना अटक केली. त्यात कारचालक आणि कारमध्ये बसलेले तिघांनी दारूचे सेवन केल्याचा संशय असून पोलिसांनी त्यांना मेडिकलसाठी पाठवले आहे. तसेच त्यांच्या गाडीतून बिअरच्या बॉटल सुद्धा मिळून आल्या आहेत. सर्व आरोपींची कसून चौकशी केली जाणार असल्याचे डीसीपी गोरख भामरे यांनी सांगितले. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

तो अपघात गुन्हे शाखेकडे द्यावा

नागपुरातील रामझुला भागात 25 फेब्रुवारी रोजी रात्री अपघात झाला होता. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित करावा, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या मोहम्मद आतिफचा भाऊ शाहरुख झिया मोहमद यांनी ही याचिका दाखल केली. यामध्ये पोलिसांना सुद्धा प्रतिवादी करण्यात आले आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.