Nagpur Murder : कुत्र्याच्या पट्ट्यानं स्वतःच्या मुलाचा गळा आवळला! बापानंच केली पोराची हत्या, नागपूर हादरलं

Nagpur Murder : संतलाल मडावी असं मुलाची हत्या करण्यात आलेल्या आरोपी पित्याचं नाव आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातून संताप व्यक्त केला जातोय.

Nagpur Murder : कुत्र्याच्या पट्ट्यानं स्वतःच्या मुलाचा गळा आवळला! बापानंच केली पोराची हत्या, नागपूर हादरलं
पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 11:59 AM

नागपूर : बापानं पोराची हत्या (Father Killed son) केल्याची घटना उघडकीस आल्यानं नागपूर (Nagpur Murder) हादरलंय. नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सुरादेवी झोपडपट्टीमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. गुलशन उर्फ गोलू असं 10 वर्षांच्या मृत मुलाचं नाव आहे. गोलूच्या वडिलांनी कुत्र्यांच्या गळ्यातील पट्ट्यानं 10 वर्षांच्या गोलूची गळा आवळून त्याचा जीव घेतला. याप्रकरणी पोलिसांनी (Nagpur crime News) नराधम बापाला अटक केली होती. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर बापानं गुन्ह्याची कबुलीदेखील दिली आहे. संतलाल मडावी असं मुलाची हत्या करण्यात आलेल्या आरोपी पित्याचं नाव आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातून संताप व्यक्त केला जातोय.

हत्येआधी काय घडलं?

मुलाला गळा कुत्र्याच्या पट्ट्यानं घोटण्याआधी नराधम बापानं आपल्या 10 वर्षांच्या मुलाला जबर मारहाण केली होती. दारु पिऊन नशेत असलेल्या या बापानं आपल्या मुलाला पाणी भरण्यास सांगितलं होतं. मुलानं पाणी भरलं नाही, म्हणून संतापलेल्या बापानं आपल्याच मुलाचा जीव घेतलाय.

कळलं कसं?

छोट्या छोट्या कारणावरुन नशेत असलेल्या बाप आपल्या मुलाचा सतत मारहाण करत असल्याचं आरोप स्थानिकांनी केल्याचं पोलिसांनी म्हटलंय. एका महिला नातेवाईकाची नजर या मुलावर पडली होती. त्यानंतर शेजारच्यांच्या मदतीनं पोलिसांत याप्रकरणी कळवण्यात आलं. त्यानंतर हत्येचा उलगडा झाला.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

गुन्ह्याची कबुली

बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलाला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला मारहाण केल्याप्रकरणी आणि त्याची हत्या केल्याचा ठपका ठेवत आरोपी पित्याला ताब्यातही घेतलंय. आरोपी पित्यानं पोलिसांच्या चौकशीत गुन्ह्याची कबुलीदेखील दिली.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.