Nagpur Crime : क्षुल्लक कारणातून ट्रक चालकाचा साथीदारांशी वाद झाला, मग चालकासोबत जे घडलं ते भयंकर

क्षुल्लक वाद टोकाला गेला मग ट्रक चालकासोबत जे घडलं ते भयंकर होतं. साथीदारांनीच चालकाला भयंकर यातना दिल्या. घटना उघड होताच परिसरात खळबळ उडाली.

Nagpur Crime : क्षुल्लक कारणातून ट्रक चालकाचा साथीदारांशी वाद झाला, मग चालकासोबत जे घडलं ते भयंकर
क्षुल्लक वादातून चालकाची हत्या
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 6:37 PM

नागपूर / 21 ऑगस्ट 2023 : नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत एक कुजलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनेचा तपास केला असता अमरावती जिल्ह्यातील वरुडमध्ये त्या चालकाच्या साथीदारानेच हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह नागपुरात आणून टाकला. याप्रकरणी वरुड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मेहबूब खान असे मयत चालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मयत चालक नागपूरचा रहिवासी असून, त्याची अमरावतीत हत्या झाली.

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळला मृतदेह

नागपुरातील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला असता सर्व घटना उघडकीस आली. मयत व्यक्ती चालक असल्याचे निष्पन्न झाले. तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये या चालकाचा काही लोकांची वाद झाला होता. त्या संदर्भात गुन्हा मयतावर दाखल झाल्याचेही निष्पन्न झाले.

साथीदारांसोबत वाद झाल्याने चालकाची हत्या

मृतक हा नागपूरचा रहिवासी होता आणि तो ट्रक चालक म्हणून काम करायचा. नागपूरवरून वरुडला तो काही साहित्य घेऊन गेला होता. त्याच्यासोबत असलेल्याच दोघांनी त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह नागपुरात आणून फेकला. या प्रकरणी वरुड पोलिसांनी आधीच दोन लोकांना अटक केली होती आणि त्या दोघांनी या हत्येची कबुली दिली. मात्र मृतदेह त्यांनी नागपूरला टाकल्याचे सांगितल्याने वरुड पोलीस नागपूरला पोहोचले आणि त्यानंतर या मृतदेहाचा शोध घेण्यात आला. तो मृतदेह मेहबूब खान नावाच्या चालकाचा असल्याचं निष्पन्न झालं. आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास नागपूर पोलिसांनी अमरावती पोलिसांकडे सोपवला आहे.

हे सुद्धा वाचा

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.