AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Murder : दोन दिवसापूर्वीच्या हत्येचे गूढ उकलण्यास नागपूर पोलिसांना यश, चोरीच्या उद्देशाने घडली घटना

मृतक हा ट्रक चालक असून तो नागपूरवरून मध्य प्रदेशमध्ये लोखंडी पाईप घेऊन जात होता. मात्र रस्त्यात त्याची गाडी खराब झाली. मृतक निलेश सेलोकरने याची माहिती मालकाला दिली. मालकाने कारमधून काही जणांना त्याच्या मदतीसाठी पाठवले. त्यांनी मात्र वेगळाच प्लान आखत गाडीतील माल विकून पैसे वाटून घेण्याचे ठरविले आणि ट्रॅक पेटवला.

Nagpur Murder : दोन दिवसापूर्वीच्या हत्येचे गूढ उकलण्यास नागपूर पोलिसांना यश, चोरीच्या उद्देशाने घडली घटना
दोन दिवसापूर्वीच्या हत्येचे गूढ उकलण्यास नागपूर पोलिसांना यशImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 1:11 AM

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पारशिवानी पोलीस स्टेशन हद्दीत दोन दिवसापूर्वी जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह (Deadbody) आढळून आला होता. याचा तपास करत ग्रामीण पोलिसांनी 36 तासांत या हत्ये(Murder)चे गूढ उकलले आहे. हत्येनंतर मृतदेह जाळण्याचा प्रकार असल्याचं पुढे आलं आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. निलेश सेलोकर असे मयत इसमाचे नाव असून तो ट्रक चालक आहे. ट्रकमधील माल चोरुन विकण्याच्या हेतूने ट्रक चालकाची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी मृतदेह जाळला. (Nagpur police succeed in identifying dead body two days ago)

ट्रकमधील मालाची चोरी उघडकीस येण्याच्या भीतीपोटी हत्या

मृतक हा ट्रक चालक असून तो नागपूरवरून मध्य प्रदेशमध्ये लोखंडी पाईप घेऊन जात होता. मात्र रस्त्यात त्याची गाडी खराब झाली. मृतक निलेश सेलोकरने याची माहिती मालकाला दिली. मालकाने कारमधून काही जणांना त्याच्या मदतीसाठी पाठवले. त्यांनी मात्र वेगळाच प्लान आखत गाडीतील माल विकून पैसे वाटून घेण्याचे ठरविले आणि ट्रॅक पेटवला. मात्र ट्रक चालक हा बदलू शकतो असा संशय त्यांना आला आणि त्यांनी त्याचा काटा काढायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी चालकाला आपल्या कारमध्ये घेऊन घाटात नेले. त्या ठिकाणी त्याच्यावर चाकूने वार केले आणि सोबत असलेले डिझेल टाकून त्याला पेटवून दिलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि एक एक कडी जोडत 3 आरोपींना अटक केली. पैशांची लालच सुटल्याने आरोपींनी हे कृत्य केलं. सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी ट्रकलासुद्धा आग लावली आणि मृतकाचा मृतदेह सुद्धा जाळला. मात्र त्यांची हुशारी पोलिसांच्या समोर चालली नाही आणि पोलिसांनी त्यांचा शोध घेत मुसक्या आवळल्या. (Nagpur police succeed in identifying dead body two days ago)

हे सुद्धा वाचा

परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय.
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश
तर 2 मिनिटांत.. LOC वर हालचाली वाढल्या? सैन्यातील विमानांना मोठा आदेश.
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या
अणुबॉम्बची धमकी देणं सोप्प आहे, पण.. ; पाकिस्तानबद्दल जी. डी. बक्षी या.
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.