नागपूर रेल्वे स्थानकावर काळ्या रंगाची बेवारस बॅग, खोलून पाहिलं तर निघालं लाखोंचं ड्रग्ज, तिघांना बेड्या
मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीची ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी मोहिम सुरु आहे. दुसरीकडे नागपुरातून एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे (Nagpur railway police arrest drug trafficker at nagpur railway station).
नागपूर : मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) अर्थात एनसीबीची ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी मोहिम सुरु आहे. दुसरीकडे नागपुरातून एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. नागपूरच्या लोहमार्ग पोलिसांनी दोन ड्रग्ज तस्करांना रंगेहाथ पकडलं आहे. त्यामुळे संपूर्ण नागपुरात या प्रकरणाची चर्चा सुरु झाली आहे. नागपूरच्या रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये पोलिसांना काळ्या रंगाची एक बेवारस बॅग सापडली. या बॅगेत जवळपास 21 लाखांपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज सापडले आहेत. विशेष म्हणजे लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत (Nagpur railway police arrest drug trafficker at nagpur railway station).
नेमकं प्रकरण काय?
नागपूरच्या मुख्य रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उभ्या असलेल्या महाराष्ट्र एक्सप्रेसच्या डी-1 कोचमध्ये एक बेवारस काळ्या रंगाची बॅग सापडली. इतर प्रवाशांच्या माहितीनंतर आरपीएफच्या पथकाने ती बॅग जप्त केली. तपासाअंती त्या बॅगमध्ये ब्राऊन शुगर (ड्रग्ज) असल्याचं निष्पन्न झालं. बॅगमध्ये ब्राऊन शुगरच्या छोट्या-छोट्या 310 पुड्या आढळून आल्या. या पुड्यांचं वजन 21.490 ग्रॅम इतकं आहे. त्याची किंमत 21 लाख 4900 इतकी असल्याची माहिती समोर आली आहे (Nagpur railway police arrest drug trafficker at nagpur railway station).
लोहमार्ग पोलिसांकडून तिघांना अटक
लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली. यामध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नागपूरहून गोंदियाला ही तस्करी केली जायची. नागपूरमध्ये वास्तव्यास असलेला आरोपी प्रकाश कोदरलीकर हा गोंदियामध्ये व्यवसाय करणारी महिला ज्योती करियार हिला ब्राऊन शुगर पुरवीत होता. ज्योतीने अर्षद नामक व्यक्तीला तस्करीच्या कामासाठी ठेवलं होतं. मात्र लॉकडाऊनमुळे बस आणि रेल्वे बंद असल्याने त्यांच्या व्यवसायाला फटका बसला होता.
पोलिसांनी कारवाई कशी केली?
रेल्वे सूरु झाल्यानंतर ज्योतीच्या आदेशावरून अर्षद महाराष्ट्र एक्सप्रेसमधून ब्राऊन शुगरची तस्करी करू लागला होता. मात्र, या तस्करीबात रेल्वे पोलिसांना गुपित माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी अर्षदची सखोल चौकशी केली तेव्हा प्रकाश कोदरलीकर आणि ज्योती करियार या दोन तस्कारांची नाव पुढे आली. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
हेही वाचा : 62 वर्षीय भाजी विक्रेतीची बलात्कारानंतर हत्या, 30 वर्षीय आरोपीला अटक