AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC : ‘माझे प्रयत्न अपुरे पडतायत!’ यूपीएससीत तीनदा अपयश, तरुणाची नागपुरात आत्महत्या

Nagpur UPSC Suicide : गेल्या आठवड्यामध्ये यूपीएससी सिविल सेवा परीक्षेचा निकाल लागला होता. या निकालात 28 वर्षांच्या ब्लेसन चाको याला यश मिळवता आलं नव्हतं.

UPSC : 'माझे प्रयत्न अपुरे पडतायत!' यूपीएससीत तीनदा अपयश, तरुणाची नागपुरात आत्महत्या
आत्महत्याImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 8:20 AM

नागपूर : यूपीएससी (UPSC Exam) परीक्षेत एकदा दोनदा नव्हे, तर तीन वेळा अपयश आल्यानं एक तरुण खचला आणि त्यानं आपलं आयुष्य संपवलं. ही धक्कादायक घटना नागपुरात घडली. नागपुरात (Nagpur Suicide News) तरुणानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडालीय. यूपीएससी परीक्षेत तीन वेळा या तरुणाला अपयश आलं. माझे प्रयत्न अपुरे पडत आहेत, असं म्हणत या तरुणानं आपली जीवनयात्रा संपवली. जरीपटका पोलीस (Nagpur News) स्टेशनच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडलीय. ब्लेसन चाको असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नावय. रविवारी पंख्याला चादर बांधून त्यांने गळफास घेतला आणि आपलं आयुष्य संपवलंय. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जातेय.

तिसऱ्या अपयश आल्यानं निराशा

गेल्या आठवड्यामध्ये यूपीएससी सिविल सेवा परीक्षेचा निकाल लागला होता. या निकालात 28 वर्षांच्या ब्लेसन चाको याला यश मिळवता आलं नव्हतं. तिसऱ्यांदा यूपीएससी अटेम्ट करणाऱ्या जरीफटका इथं राहणाऱ्या ब्लेसनला या निकालाने मोठा धक्का दिला. सोमवारी संध्याकाळी निराशेने ग्रासलेल्या या तरुणानं सिलिंग फॅनला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.

घरात गळफास लावून घेत आत्महत्या

रविवारी या तरुणानं पंख्याला चादर बांधून गळफास लावून घेतला आणि जीव दिला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. जरीपटका पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. राहत्या घरात या तरुण मुलानं जीव दिल्यानं त्याच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसलाय. घरातील पंख्याला लटकून या मुलानं आत्महत्या केली. घरात या मुलाचं पंख्याला लटकलेलं शव पाहून सगळेच हादरले होते. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन घेतली असून अधिक तपास आता केला जातोय.

हे सुद्धा वाचा

यूपीएससी परीक्षेसाठी मुलं प्रचंड मेहनत घेत असतात. पण अनेकांना या परीक्षेत यश संपादीत करता येत नाही. पण म्हणून टोकाचं पाऊल उचलत आत्महत्येसारखा निर्णय घेण्याचा विचार मनात आणणंही चूक आहे. मुलांनी खचून न जाता आयुष्यातील कठीण प्रसंगांना स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. संकटांवर मात करत संघर्ष करण्याला पर्याय नाही, हेही समजून घेतलं पाहिजे. तसंच कोणत्याही परीक्षेत आलेल्या अपयशाने खचून न जाता, नेहमी नव्या जोमाने सुरुवात करायला हवी.

पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.