Consumer Commission | एक-दोन नव्हे अल्ट्रासाउंडचे चारही रिपोर्ट चुकीचे! नागपुरातील लॅबला सव्वा कोटींचा दंड, जाणून घ्या काय आहे प्रकरण…

बाळाचा जन्म झाल्यानंतर माहिती झालं बाळाला बोट नाहीत. पायही पूर्णपणे तयार झालेले नाहीत. याला चुकीची अल्ट्रासाऊंड रिपोर्ट कारणीभूत असल्याचं सिद्ध झालं. पीडित महिला इमेजिंग पॉइंट लॅबमधून अल्ट्रासाऊंड करत होती. एनसीडीआरसीच्या दोन सदस्यीय चमूनं लॅबला बाळाच्या कल्याणासाठी मोबदला, भविष्याच्या उपचारासाठी तसेच कृत्रिम अंग खरेदी करण्यासाठी हा दंड ठोठावला.

Consumer Commission | एक-दोन नव्हे अल्ट्रासाउंडचे चारही रिपोर्ट चुकीचे! नागपुरातील लॅबला सव्वा कोटींचा दंड, जाणून घ्या काय आहे प्रकरण...
नागपुरातील लॅबला सव्वा कोटींचा दंड
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 12:04 PM

नागपूर : नागपुरातल्या अल्ट्रासाऊंड लॅबनं चार वेळा रुग्णाचा चुकीचा अहवाल दिला. त्यामुळं या लॅबवर (Lab) मोठा दंड आकारण्यात आलाय. नॅशनल कंझुमर कमिशननं (National Consumer Commission) हा ऐतिहासिक निर्णय दिला. बाळाच्या आईवडिलांना दीड कोटी रुपये मोबदला देण्याचा निर्णय दिला. टाईम्स ऑफ इंडिया दिलेल्या बातमीनुसार, नागपुरात एक महिला गरोदरपणात अल्ट्रासाऊंड करत होती. परंतु, प्रत्येक वेळी तिला चुकीचा अहवाल दिला. त्यामुळं तिला झालेलं बाळ ही विकलांग झालं. बाळाच्या जन्मापूर्वीचं काही कमतरता राहतात. 17-18 आठवड्याची गरोदर असताना पोटातील बाळ विकलांग असेल, तर डॉक्टर त्यांनी अबॉर्शन (Abortion) करण्याचा सल्ला देतात.

चुकीच्या रिपोर्टमुळं विकलांग बाळ जन्माला

बाळाचा जन्म झाल्यानंतर माहिती झालं बाळाला बोट नाहीत. पायही पूर्णपणे तयार झालेले नाहीत. याला चुकीची अल्ट्रासाऊंड रिपोर्ट कारणीभूत असल्याचं सिद्ध झालं. पीडित महिला इमेजिंग पॉइंट लॅबमधून अल्ट्रासाऊंड करत होती. एनसीडीआरसीच्या दोन सदस्यीय चमूनं लॅबला बाळाच्या कल्याणासाठी मोबदला, भविष्याच्या उपचारासाठी तसेच कृत्रिम अंग खरेदी करण्यासाठी हा दंड ठोठावला.

16 वर्षानंतर मिळाला न्याय

ही घटना 2006 सालही आहे. डॉक्टरनं पीडित महिलेला या लॅबमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. परंतु, चारही रिपोर्ट चुकीचे निघाले. पीडित कुटुंबाने दहा कोटी रुपयांचा मोबदला देण्याची मागणी केली होती. मिळणारी रक्कम फिक्स डिपॉझिट ठेवावी, असं म्हटलं होतं. परंतु, एनसीडीआरसीच्या दोन सदस्यीच चमुनं सव्वा कोटी रुपयांचा मोबदला पीडितांना देण्याचा निर्णय दिला. त्यामुळं चुकीचं रिपोर्ट देणं या लॅबला चांगलच महागात पडलं.

हे सुद्धा वाचा

उशिरा का होईना न्याय मिळाला

इमेजिंग पॉईंट या लॅबचे घटनेनंतर दो तुकटे झाले. न्यू इमेजिंग पॉईंट ही दुसरी लॅब तयार झाली. एखाद्या डॉक्टरच्या चुकीमुळं काय होऊ शकतं, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. म्हणून डॉक्टरांना भगवान समजलं जातं. पण, काही लोकं अशा चुकांवर पांघरून घालतात. एखाद्या वेळी रिपोर्ट चुकीचा येऊ शकतो. या प्रकरणात तब्बल चार वेळा रिपोर्ट चुकीचा देण्यात आला. त्यामुळं या लॅबला दंड ठोठावण्यात आला. उशिरा का होईना पण, पीडितेला न्याय मिळाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.