Nagpur Theft : सराफा व्यापाऱ्यावर हल्ला करुन लुटणारी टोळी जेरबंद, लुटलेला मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपींकडून 1100 ग्रॅम सोन्याचे दागिने सुद्धा जप्त केले. महत्वाचं म्हणजे या गुन्ह्याचा छडा लावण्यायला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोन लाखांचं रोख बक्षिस देणार असल्याचे शहर पोलीस आयुक्तांनी जाहीर केले. त्यामुळे नागपूर पोलिस दलाच्या अनेक विभागातील शेकडो पोलिस अधिकारी आरोपींच्या मागावर होते.

Nagpur Theft : सराफा व्यापाऱ्यावर हल्ला करुन लुटणारी टोळी जेरबंद, लुटलेला मुद्देमाल जप्त
धुळ्यातील कापडणे यात्रोत्सवात चोरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 10:58 PM

नागपूर : नागपुरात शनिवारी सराफा व्यापाऱ्यावर हल्ला करून सोनं लुटणाऱ्या टोळीला नागपूर पोलिसांनी 27 तासांत बेड्या (Arrest) ठोकत मुद्देमाल जप्त (Siezed) केला. काहीही पुरावे नसल्याने पोलिसांसमोर आरोपी शोधणे हे मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी अथक प्रयत्न करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्तांनी या टीमला चार लाख रुपयाचं बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला. दिवसाढवळ्या सराफा व्यापारी केतन बटूकभाई कामदार यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकल्यानंतर त्यांच्यावर चाकूने हल्ला करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या तिघांना नागपूर पोलिसांनी अवघ्या 27 तासांत अटक केली. याशिवाय या लूट प्रकरणात टीप देणाऱ्यासह प्लॅनिंग करणाऱ्या तिघांना सुद्धा अटक केली आहे. त्यामुळे एकूण आरोपींची संख्या ही 6 झाली आहे. (Police in Nagpur have arrested a gang of robbers who attacked a gold trader)

टोळीकडून 1100 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत

पोलिसांनी आरोपींकडून 1100 ग्रॅम सोन्याचे दागिने सुद्धा जप्त केले. महत्वाचं म्हणजे या गुन्ह्याचा छडा लावण्यायला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोन लाखांचं रोख बक्षिस देणार असल्याचे शहर पोलीस आयुक्तांनी जाहीर केले. त्यामुळे नागपूर पोलिस दलाच्या अनेक विभागातील शेकडो पोलिस अधिकारी आरोपींच्या मागावर होते. सराफाला जखमी करून लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी परसली. त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी अवस्थेत सराफा व्यापारी केतन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी घटनेची तक्रार दाखल केली होती.

पोलिस आयुक्तांकडून पोलिस टीमला चार लाखांचे बक्षीस

तक्रार दाखल होताच संपूर्ण नागपूर पोलीस विभाग आरोपींना जेरबंद करण्यासाठी अलर्टमोडवर कामाला लागले होते. त्यामुळे अवघ्या 27 तासात पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून पोलिसांनी सुमारे 60 ते 70 लाख रुपये किंमतीचे 1100 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी नागपूर पोलिसांच्या विविध विभागांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे शहर पोलिस आयुक्तांनी या मोहिमेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चार लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले. पोलिसांनी अवघ्या 20 तासांत या प्रकरणाचा छडा लावून लुटलेले 1100 ग्राम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी केलेली कामगिरी अविश्वसनीय असल्याने नागपूर सराफा व्यापारी असोसिएशनकडून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सत्कार करण्यात आला. (Police in Nagpur have arrested a gang of robbers who attacked a gold trader)

इतर बातम्या

Fraud : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 40 चीनी नागरिकांसह 150 जणांविरोधात एफआयआर दाखल

Sangli Sabha : सांगलीत महापालिका महासभेत प्रचंड गदारोळ, महिला नगरसेवकांनी राजदंड पळवला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.