शांतीनगर : शरणागत महाराजांनी महादेवाच्या चरणी सोडला देह, पूजा करताना मंदिरातच मृत्यू
पावनगावचे शरणागत महाराज (वय 75 वर्षे)... महाराज शिवभक्त असल्यानं नेहमी पूजाअर्जना करायचे. लालगंज येथील शिवमंदिरात त्यांनी 12 नोव्हेंबरला सायंकाळी देह ठेवला. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
नागपूर : पावनगावचे शरणागत महाराज (वय 75 वर्षे)… महाराज शिवभक्त असल्यानं नेहमी पूजाअर्जना करायचे. लालगंज येथील शिवमंदिरात त्यांनी 12 नोव्हेंबरला सायंकाळी देह ठेवला. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
शरणागत महाराज हे भगवे वस्त्र परिधान करीत असतं. भक्तिमार्गात असल्यानं त्यांनी लग्न केलं नव्हतं. त्यामुळं संसाराचा रहाटगाडगा नव्हता. पावनगाव परिसरातील मंदिरांत ते जातं. तिथं पूर्जअर्जना करत. वयाच्या उत्तरार्धात असल्यानं ते थकले होते. शुक्रवारी ते लालगंज येथील शिवमंदिरात आले. देवाच्या चरणी प्रार्थना केली. त्यानंतर ते उठलेच नाहीत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी लक्षात आली. दुलीचंद अरखेल यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घातपाताची कोणतीही शक्यता नसल्याचं पोलीस उपनिरीक्षक गोमासे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.
2,829 वाहनचालकांवर कारवाई
नागपूर वाहतूक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली 2,829 वाहनचालकांवर कारवाई केली. एकूण तडजोड शुल्क 1,49,300 वसूल करण्यात आले. तसेच मुंबई दारुबंदी कायद्यान्वये 8 प्रकरणात 8 आरोपींना अटक करून 22,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर जुगार कायद्यान्वये 6 प्रकरणात ७ आरोपींना अटक करून 1,27,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही सर्व मोहीम एकत्रितरीत्या शहर पोलिसांच्यावतीने राबविण्यात आली.
तरुणाचा संशयास्पद मृत्यू
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा पान शॉप समोर मृतदेह आढळून आला. ही घटना शनिवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अजय भरतलाल शाहू (32) रा. सहकारनगर, रमना मारोती रोड असे मृतकाचे नाव आहे. अजय याचा मृत्यू नेमका कशानी झाला, याबाबत अद्याप स्पष्टता झाली नाही. याप्रकरणी मनोज शाहू (50) यांनी दिलेल्या सूचनेवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
आता माघार नाही; पिंपरीत ६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई