Nagpur Crime | पहिल्याशी केला प्रेमविवाह तो निघाला बेवडा, दुसऱ्याशी घरोबा त्यानेही सोडले, नागपुरात दोघांचीही पत्नीविरोधात पोलिसांत धाव

तिला औरंगाबादच्या एका युवकाचा मिसकॉल आला. त्यातून दोघांनी एकमेकांशी चँटिंग झाले. दोघांचाही एकमेकांशी संपर्क वाढला आणि ती दुसऱ्याच्या प्रेमात पडली. दोघांचे प्रेमसंबंध वाढले. तिने दुसऱ्याला नागपूरला बोलावले. त्याला अविवाहित असल्याचे सांगितले. त्याने थेट नागपुरातच काम शोधले आणि तिच्याशी प्रेमविवाह करण्याची तयारी दर्शविली.

Nagpur Crime | पहिल्याशी केला प्रेमविवाह तो निघाला बेवडा, दुसऱ्याशी घरोबा त्यानेही सोडले, नागपुरात दोघांचीही पत्नीविरोधात पोलिसांत धाव
नागपुरात दोघांचीही पत्नीविरोधात पोलिसांत धाव
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 3:27 PM

नागपूर : एका महिलेनं प्रेमविवाह (love marriage) केला. ते दोन एका मुलाचे पालक आहेत. लग्नाच्या चार वर्षानंतर तिनं दुसऱ्या प्रियकरासोबत लग्न केलं. तिनं दुसऱ्या प्रियकरासोबत ( boyfriend) दोन वर्षांपूर्वी मंदिरात (temple) विवाह केला. अशाप्रकारे दुसरा नवरा तिच्या आयुष्यात आला. दुसऱ्या नवऱ्यासाठी तिनं पहिला नवरा आणि दोन मुलांना सोडलं. त्यानंतर ती दुसऱ्या नवऱ्यासोबत राहू लागली. पण, तिचं पहिलं लग्न झालं आहे, असं दुसऱ्याला माहीत झालं. त्यामुळं तो तिच्याशी भांडू लागला. ती त्यालाही सोडून बहिणीसोबत राहायला गेली. तिचा पहिला नवरा हा गवंडी काम करतो. तर, दुसरा नवरा हा ऑप्टिक फायबर टाकायचं काम करतो. दुसरा नवरा हा काही दिवसांपूर्वी सोनेगाव पोलिसांकडं तक्रार घेऊन गेला.

ग्वाल्हेर टू नागपूर कामाच्या शोधात

दोघांनाही सोडल्यामुळे दुसऱ्या पतीने तिच्या पहिल्या पतीचा शोध घेतला. दोघेही भरोसा सेलला तक्रार करायला आले आणि न्यायाची मागणी करू लागले. त्यांची तक्रार ऐकून आता पोलीसही विचारात पडले. जर ती प्रियकरासह पोलिसांकडे आली तर पोलिसांनी तिचे कसे समुपदेशन करावे, याबाबत पोलीस संभ्रमात पडले. तिचा पहिला पती मिस्त्री असून तो वाठोड्यात राहतो. महिला ही मूळची ग्वाल्हेरची आहे. मोठ्या बहिणीसह कामाच्या शोधात नागपुरात आली. पहिल्या पतीशी तिची ओळख झाली. काही दिवसांतच त्या दोघांचे सूत जुळले. दोघांनी दोन महिन्यातच पळून जाऊन प्रेमविवाह केला. त्यांच्याकडून तिला एक मुलगा झाला. पण, तो पहिला नवरा हा बेवडा निघाला. तो नेहमी दारू द्यायचा. त्यामुळं तिच्या जीवनात दुसरा आला.

औरंगाबादच्या युवकाशी प्रेमप्रकरण

यादरम्यान तिला औरंगाबादच्या एका युवकाचा मिसकॉल आला. त्यातून दोघांनी एकमेकांशी चँटिंग झाले. दोघांचाही एकमेकांशी संपर्क वाढला आणि ती दुसऱ्याच्या प्रेमात पडली. दोघांचे प्रेमसंबंध वाढले. तिने दुसऱ्याला नागपूरला बोलावले. त्याला अविवाहित असल्याचे सांगितले. त्याने थेट नागपुरातच काम शोधले आणि तिच्याशी प्रेमविवाह करण्याची तयारी दर्शविली. तिने पहिल्या पतीला गावी जात असल्याचं सांगून दुसऱ्यासोबत शिवमंदिरात प्रेमविवाह केला. दोघांही सोनेगावात संसार थाटला. पहिला पती तिच्या विरहात दारू प्यायला लागला. पण, दुसऱ्या नवऱ्याला ती आधी विवाहित असल्याची माहिती झाली. यातून त्यांचे भांडण झाले. त्यामुळं ती त्यालाही सोडून बहिणीकडं राहायला गेली. ती तिसऱ्यासोबत तर गेली नाही ना, अशी शंका या दोघांना आली. त्यामुळं ते भरोसा सेलकडं गेले होते. पण, भरोसा सेलनं त्यांना परत सोनेगाव पोलिसांत जाण्यास सांगितलं.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.