Nagpur Crime : नागपूरमध्ये भंगारमध्ये विकत घेतलेल्या कारमध्ये आढळला मृतदेह

तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नौशाद नामक भंगार व्यवसायिकाने आठ दिवसांपूर्वी एक जुनी कार विकत घेतली. त्याच्या गोदामात ती कार पडून होती. आज ती कार कापण्यासाठी तो आणि त्याचे कामगार कारजवळ गेले. कारजवळ जाताच त्यांना दुर्गंध येऊ लागला. त्यांनी कारची डिक्की उघडताच त्यात 35 वर्ष वयोगटातील मृतदेह आढळला.

Nagpur Crime : नागपूरमध्ये भंगारमध्ये विकत घेतलेल्या कारमध्ये आढळला मृतदेह
नागपूरमध्ये भंगारमध्ये विकत घेतलेल्या कारमध्ये आढळला मृतदेहImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 10:27 PM

नागपूर : कबाड्याने भंगारमध्ये विकत घेतलेल्या एका कारच्या डिक्कीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह (Deadbody) आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गार्डलाईन परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भंगारवाल्याने तात्काळ तहसिल पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तहसिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम करीत आहेत. अधिक तपास सुरु आहे. (The body was found in a car bought in scrap in Nagpur)

भंगारवाला कार कापण्यासाठी गेला असता मृतदेह आढळला

तहसिल पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नौशाद नामक भंगार व्यवसायिकाने आठ दिवसांपूर्वी एक जुनी कार विकत घेतली. त्याच्या गोदामात ती कार पडून होती. आज ती कार कापण्यासाठी तो आणि त्याचे कामगार कारजवळ गेले. कारजवळ जाताच त्यांना दुर्गंध येऊ लागला. त्यांनी कारची डिक्की उघडताच त्यात 35 वर्ष वयोगटातील मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ ही माहिती तहसिल पोलिसांना कळवली. आरोपींनी हत्या करून कारच्या डिक्कीत मृतदेह लपवला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. व्यक्तीती ओखळ अद्याप पटली नाही. सदर व्यक्तीबाबत कोणत्या पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल आहे काय? याबाबत पोलिस शोध घेत आहेत. मृतदेहाच्या शरीरावर कुठल्याच जखमा नसल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे खुन झाला की दुसरे कारण याचा शोध पोलिस घेत आहेत. (The body was found in a car bought in scrap in Nagpur)

इतर बातम्या

Kashmir Murder : कश्मीरात दहशतवाद्यांचा हैदोस सुरूच; सरपंचाची गोळ्या झाडून केली हत्या

Nanded Murder : नांदेडमध्ये मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन तरुणाची हत्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.