एटीएममधून निघणारे पैसे अडकवायचे, मग दबा धरून बसलेले चोरायचे, कसे?
मात्र बाहेर दबा धरून बसलेले हे आरोपी एटीएममध्ये जायचे. तो व्यक्ती निघताच एटीएमच्या आत प्रवेश करायचे. रॉडच्या साह्याने त्या चीपमधून पैसे काढायचे. त्यानंतर तिथून पळ काढायचे.
सुनील ढगे
नागपूर : चोरट्यांनी एटीएममधून पैसे कसे चोरायचे, यासाठी गुगलवर मोठा अभ्यास केला. त्यातून माहिती मिळवली. त्यासाठी त्यांनी एक चीप बनवली. ती चीप एका छोट्या रोडच्या साह्याने एटीएममध्ये टाकून ठेवायचे. त्यामुळे एटीएममधून निघणारे पैसे तिथे अडकायचे. मग एखादा व्यक्ती ट्रांजेक्शन करायला जायचा. त्याचं ट्रांजेक्शन तर व्हायचं. मात्र पैसे बाहेर येत नव्हते. त्यामुळे त्याला आपलं ट्रांजेक्शन अनसक्सेस झालं, असं वाटायचं. तो निघून जायचा.
मात्र बाहेर दबा धरून बसलेले हे आरोपी एटीएममध्ये जायचे. तो व्यक्ती निघताच एटीएमच्या आत प्रवेश करायचे. रॉडच्या साह्याने त्या चीपमधून पैसे काढायचे. त्यानंतर तिथून पळ काढायचे.
जणू काही हा धंदाच त्यांनी उघडला होता. उत्तर प्रदेशातून तीनही आरोपी नागपुरात आले होते. नागपुरात त्यांनी अशाप्रकारे अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याचं समोर आलं.
अनेक दिवस पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. पोलीस आता या टोळीमध्ये आणखी काही लोकांचा समावेश आहे का, याचा शोध घेत आहेत. अशी माहिती तहसील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली.
आरोपींनी नागपुरात चोऱ्या करून उत्तर प्रदेशात पळ काढला होता. मात्र सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी उत्तर प्रदेशात पोहोचून यांच्या मुसक्या आवळल्या.
अभ्यास चांगल्या गोष्टीचा करावा हे अपेक्षित असते. मात्र यांनी तर चक्क लोकांना लुटण्याचा अभ्यास सुरू केला होता. मात्र आता त्यांना जेलची हवा खावी लागणार आहे.
नागपूरच्या तहसील पोलिसांनी एटीएममध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा असा पर्दाफाश केला. उत्तर प्रदेशातील एका गॅंगला अटक करण्यात यश मिळविले.
या चोरट्यांनी एटीएममधून पैसे कसे चोरायचे, याचा गूगलवरून अभ्यास केला होता. परराज्यात जाऊन हा धंदाच सुरू केला. मात्र आता हे पोलिसांच्या जाळ्यात अडकले.