वर्धा : वर्धा जिल्ह्यात (Wardha crime news) एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका गर्भवती श्वानाची माथेफिरुने हत्या केली. या संपाजनक घटनेची दाहकता अधोरेखित करणारं सीसीटीव्ही फुटेजही (Shocking CCTV Video) समोर आलंय. या घटनेन परिसरात खळबळ माजली आहे. वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालु्क्यात गर्भवती श्वानाची अज्ञात माथेफिरुने चाकू भोसकून हत्या (Dog killed) केली. 21 ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. रविवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. भर चौकात रात्रीच्या सुमारास पोटात चाकू भोसकून निर्दयीपणे श्वानाला ठार मारण्या आलं. विशेष म्हणजे यावेळी श्वान झोपेत असताना तिच्यावर वार करण्यात आला. यानंतर घटनास्थळावरुन माथेफिरु नराधम फरार झाला. याप्रकरणीर आता आरोपीला अटक करण्याची मागणी जोर धरतेय.
तो दिवस होता 21 ऑगस्ट. रविवारची रात्र होतं. घडाळ्यात 11 वाजून 19 मिनिटं झाली होती. देवळी तालुक्यातील ठाकरे चौकात रस्त्याच्या कडेला एक गर्भवती श्वान सीसीटीव्ही व्हिडीओत दिसून येते. एक माणूस आपल्या दिशेनं येतो, हे पाहून ती भेदरुन जाते. रस्ताच्या कडेला जाऊन बसते. पण इतक्यात एक माथेफिरून रस्त्याच्या कडेला गेलेल्या श्वानाच्या दिशेने जातो. त्यानेतर गर्भवतीच्या थेट पोटातच चाकूने सपासप भोसकलं. रक्तबंबाळ झालेल्या गर्भवती श्वानाने कळवळतच रस्त्यावर प्राण सोडला. निर्दयीपणे करण्यात आलेल्या श्वानाच्या हत्येनंतर माथेफिरुने घटनास्थळावरुन पळ काढला. आता या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही समोर आला असून प्राणीप्रेमींनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हैवानतेचा कळस! गर्भवती कुत्रीच्या पोटात चाकू भोसकून तिची हत्या केली, माथेफिरूचं रानटी कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, वर्ध्यातली संतापजनक घटना… #WATCH #maharashtranews #Wardha pic.twitter.com/Yw1e1pjfXe
— Siddhesh Sawant (@ssidsawant) August 25, 2022
या निर्दयी कृतीबाबत आरोपीला अटक केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वर्ध्यामधील युवा परिवर्तन की आवाज या संघटनेचे संस्थापक निहाल पांडे यांनी ही घटना निंदनीय असून याप्रकरणी आरोपीला कठोरातली कठोरी शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. देवळी पोलीस स्थानकाने या घटनेची तत्काळ दखल घ्यावी आणि मुक्या जनावराची केलेली हत्या दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. पोलिसांनी कारवाई केल नाही, आम्ही पोलीस स्थानकासमोर येऊन निदर्शनं करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.