Yavatmal : लागोपाठ दोन मुली झाल्या म्हणून पतीचा पत्नीवर कोयत्याने हल्ला! यवतमाळमधील धक्कादायक घटना

जखमीला जयश्रीचे नातेवाईक तिला उपचारसाठी नांदेड येथे घेऊन गेले होते. घटनास्थळावर रक्ताचा सडा पोलिसांनी पाहिला. बाजूलाच रक्ताने माखलेला लोखंडी कोयता व नायलॅान दोरी पडून होती. ते सर्व साहीत्य जप्त करण्यात आले.

Yavatmal : लागोपाठ दोन मुली झाल्या म्हणून पतीचा पत्नीवर कोयत्याने हल्ला! यवतमाळमधील धक्कादायक घटना
यवतमाळमधील संतापजनक घटना...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 11:22 AM

यवतमाळ : लागोपाठ मुली झाल्या म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीचा जीव (Yavatmal Crime News) घेण्याचा प्रयत्न केला. संतापजनक बाब म्हणजे चक्क कोयत्याने वार करत पतीने हे हडळकृत्य केलं. त्याआधी त्याने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून आधी पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीने पतीच्या हल्ल्याला (Husband Attacked on wife) हुसकावून लावत विरोधात केला. अखेर पतीने थेट कोयताच हातात घेतला आणि पत्नीवर वार केले. यामध्ये पत्नीच्या मानेला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पत्नी या हल्ल्यामध्ये रक्तबंबाळ झाली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खुद्द पतीनेच या नंतर पोलीस स्थानक गाठलं आणि आपलं काय केलंय, याची कबुलीही पोलिसांसमोर दिली. पतीनेच सांगितलेला सगळा किस्सा ऐकून पोलीसही (Yavatmal Police) चक्रावून गेले. ही धक्कादायक घटना उघडकीस येण्याआधी पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. नेहमीचे वाद, त्यानंतर लागोपाठ झालेल्या दोन्ही मुलीच याचा राग मनात धरुन पतीने पत्नीला संपवण्यासाठी हे संतापजनक कृत्य केलं.

नेमकी कुठं घडली घटना?

ही घटना यवतमाळ जिल्ह्यामधील पार्डी बंगला इथं घडली. लागोपाठ दोन मुली झाल्याच्या कारणातून पती शिवाजी चव्हाण नेहमीच पत्नी जयश्रीसोबत वाद घालत तिला मारहाण करायचा. दरम्यान अशाच वादातून त्याने तिला सुरुवातीला नायलॉन दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याला पत्नीने विरोध केला असता चिडून पतीने पत्नीवर लोखंडी कोयत्याने डोक्यावर, मानेवर वार केले. या घटनेनंतर आरोपीने पोफाळी पोलीस स्टेशन गाठून हे कृत्य केल्याची कबुली दिली दिली.

पोलिसांच्या तपासात काय आढळलं?

जयश्री शिवाजी चव्हाण अस गंभीर जखमी पत्नीचे नाव असून शिवाजी अवधुत चव्हाण (वय 38, राहणार पार्डी बंगला) असे आरोपी पतीचे नाव आहे. शिवाजी चव्हाण याने कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची माहिती दिल्यावरुन ठाणेदार राजीव हाके, प्रकाश बोंबले यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जखमीला जयश्रीचे नातेवाईक तिला उपचारसाठी नांदेड येथे घेऊन गेले होते. घटनास्थळावर रक्ताचा सडा पोलिसांनी पाहिला. बाजूलाच रक्ताने माखलेला लोखंडी कोयता व नायलॅान दोरी पडून होती. ते सर्व साहीत्य जप्त करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

दरम्यान जखमी पत्नीच्या जबाबावरुन पोफाळी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध कलम 307 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी शिवाजी चव्हाण याला कोर्टासमोरही हजर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत केलीय. सध्या शिवाजी याची पोलिसांकडून आता कसून चौकशी सुरु असून पुढील कारवाईदेखील सुरु आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.