शेतातील घरात खून, देहाचे तुकडे करत विल्हेवाट, तब्बल दहा वर्षांनी बहुचर्चित मनीष श्रीनिवास अपहरण प्रकरणाचा उलगडा

नागपुरात तब्बल दहा वर्षांनंतर बहुचर्चित मनीष श्रीनिवास अपहरण आणि खून प्रकरणाचा उलगडा करण्यात नागपूर गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे (Nagpur Manish Srinivas abduction case unravels after ten years).

शेतातील घरात खून, देहाचे तुकडे करत विल्हेवाट, तब्बल दहा वर्षांनी बहुचर्चित मनीष श्रीनिवास अपहरण प्रकरणाचा उलगडा
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 10:35 PM

नागपूर : नागपुरात तब्बल दहा वर्षांनंतर बहुचर्चित मनीष श्रीनिवास अपहरण आणि खून प्रकरणाचा उलगडा करण्यात नागपूर गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात कुख्यात गुंड रणजित सफेलकर, कालु नारायण हाटे, भरत नारायण हाटे, छोटू बागडे आणि इसाक मस्के नामक आरोपींचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे. नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली (Nagpur Manish Srinivas abduction case unravels after ten years).

पोलिसांनी तपास कसा केला?

शरद हाटे आणि कालु हाटे या दोन आरोपींना एकनाथ निमगडे खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान मनीष श्रीवास खून प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या खून प्रकारणाचा म्होरक्या रणजित सफेलकर हा असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र मनिषच्या खुनामागील कारणांचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही.

मनीष श्रीनिवास यांच्या पत्नीची 2016 मध्ये अपहरणाची तक्रार

नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्यात 1 मार्च 2016 रोजी मनीष श्रीनिवास यांच्या पत्नी सावित्री श्रीनिवास यांनी मनीष यांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी या प्रकरणाचा तपास पाचपावली पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, त्यात पोलिसांना यश आले नसल्याने अखेर तपास गुन्हे शाखा पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आला होता (Nagpur Manish Srinivas abduction case unravels after ten years).

आरोपींकडून मनीष यांची 2012 मध्ये हत्या

सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2016 साली मनीष यांच्या अपहरणाची तक्रार दाखल झाल्याच्या चार वर्षांपूर्वीच आरोपींनी मनीष श्रीनिवासचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. एकनाथ निमगडे खून प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची सखोल चौकशी पोलिसांनी केली असता त्यांनी मनीष श्रीनिवास यांचीदेखील 2012 मध्ये हत्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपींनी कामठी परिसरातील एका शेतातील घरामध्ये मनीष यांचा खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याची माहिती देखील आरोपींनी दिली आहे.

सहा खुनाच्या घटनांची उकल करण्यावर पोलिसांचं काम सुरु

उलगडा न झालेल्या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. गेल्या काही वर्षांत नागपूर शहरात अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत, ज्यांचा उलगडा अद्यापही होऊ शकलेला नाही. त्यापैकी सहा खुनाच्या घटनांची उकल करण्यावर पोलीस विभाग काम करत असल्याची माहिती शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. गेल्याच आठवड्यात बहुचर्चित एकनाथ निमगडे खून प्रकरणाचा उलगडा करण्यात नागपूर गुन्हे शाखा पोलिसांना मोठे यश मिळाले होते. लगेचच मनीष श्रीनिवास खून प्रकरणाचा उलगडा करून पोलिसांना मोठे यश मिळवले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.