प्रेमाला विरोध करणाऱ्या आजीसह नातवाची निर्घृण हत्या, मग रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, नागपुरात खळबळ
प्रेमाला विरोध करणाऱ्या आजीसह नातवाचा मोईनने खून केला होता. त्यानंतर त्याने स्वत: देखील आता आत्महत्या केल्याची माहिती आहे
नागपूर : नागपुरातील दुहेरी हत्याकांडातील आरोपी मोईन खानने आत्महत्या केल्याची माहिती आहे (Murder Accuse Moin Khan Commit Suicide). एकतर्फी प्रेमाला विरोध करणाऱ्या आजीसह नातवाचा मोईनने खून केला होता. त्यानंतर त्याने स्वत: देखील आता आत्महत्या केल्याची माहिती आहे (Murder Accuse Moin Khan Commit Suicide).
गिट्टीखदान पोलीस ठाण्याअंतर्गत हजारीपहाड भागातील दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरलं होतं. गुरुवारी आजी आणि चिमुकल्या नातवाची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 70 वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि 10 वर्षीय यश धुर्वे अशी मृतकांची नावे आहेत. प्रेम प्रकरणाच्या वादातून हत्याकांड घडल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. या प्रकरणात मोईन खान नावाचा व्यक्ती संशयित आरोपी होता.
मृत आजीच्या नातीनचे आरोपी मोईन खानसोबत प्रेम प्रकरण होते. मात्र, आजीचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. त्यामुळे चिडून मोईन खानने लक्ष्मीबाई धुर्वे आणि नातू यश धुर्वे यांची हत्या केली होती.
याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोली मोईन खानचा शोध घेत होते. तो कालपासून फरार होता. मात्र, आज त्यानेच आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
दुहेरी हत्याकांडातील आरोपी मोईन खानने रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्याने आत्महत्या का केली याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, मोईन खानच्या आत्महत्येने सध्या या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. त्याने ही आत्महत्या का केली असावी याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी आत्यहत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.
किरकोळ वादातून तरुणाच्या अंगावर कार घालून हत्या, तीन तासात आरोपींना बेड्याhttps://t.co/pa3AJz29Oa #crime #dombivali
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 8, 2020
Murder Accuse Moin Khan Commit Suicide
संबंधित बातम्या :
भीक मागणाऱ्या दिव्यांग मुलानं जेवण मागितलं, रागवलेल्या हॉटेल चालकाचं माणुसकीला काळिमा फासणारं कृत्य
भररात्री शेतकऱ्याचा खून, आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांसमोर आव्हान
दहा दिवसांपूर्वी अटक, बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांची आत्महत्या, घटना सीसीटीव्हीत कैद