दैवी शक्तीने कोरोना बरा करतो, अंगात शेषनाग संचारतो, पैशांचा पाऊस पाडतो, नागपुरात ढोंगीबाबाचा फिल्मी स्टाईल पर्दाफाश

कोरोनाच्या महामारीत प्रत्येक जण आपल्याला कोरोनापासून कसं वाचता येईल याचा प्रयत्न करत आहे. मात्र काहींनी कोरोनाच्या नावाने अंधश्रद्धेचा बाजार मांडला आहे (Nagpur police bust a hypocrite baba).

दैवी शक्तीने कोरोना बरा करतो, अंगात शेषनाग संचारतो, पैशांचा पाऊस पाडतो, नागपुरात ढोंगीबाबाचा फिल्मी स्टाईल पर्दाफाश
पोलिसांनी गुणवंत बाबा (खरं नाव शुभम तायडे) या ढोंगीबाबास जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत अटक केली आहे
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:53 AM

नागपूर : कोरोनाच्या महामारीत प्रत्येक जण आपल्याला कोरोनापासून कसं वाचता येईल याचा प्रयत्न करत आहे. मात्र काहींनी कोरोनाच्या नावाने अंधश्रद्धेचा बाजार मांडला आहे. असाच काहीसा एक प्रकार नागपुरात उघडकीस आला. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी शहरातील एका ढोंगीबाबाचा पर्दाफाश केला आहे. आपल्या दैवी शक्तीने कोरोनासारखा आजार बरा होतो, असा दावा या ढोंगीबाबाने केला होता. मात्र, त्याचे अंधश्रद्धेचे सर्व कारस्थान पोलिसांनी उळधून लावले (Nagpur police bust a hypocrite baba).

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ढोंगीबाबा विरोधात तक्रार

पोलिसांनी गुणवंत बाबा (खरं नाव शुभम तायडे) या ढोंगीबाबास जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत अटक केली आहे. या ढोंगीबाबाविरोधात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पंचशीलनगरात राहणाऱ्या ढोंगीबाबा शुभम तायडे नामक गुणवंतबाबाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच कार्यकर्ते आणि पोलिसांच्या चमूने सापळा रचून त्याच्या दुष्कृत्याचा भंडाफोड केला (Nagpur police bust a hypocrite baba).

बाबा दैवी शक्तीने बऱ्याच गोष्टी करत असल्याचा भक्तांचा दावा

बाबा दैवी शक्तीने पैशाचा पाऊस पाडतो, सट्ट्याचा नंबर देतो, गुप्तधन शोधतो, आजार दूर करतो, भक्तांच्या घरातील भानगडी दूर करतो आणि स्वप्नात येऊन समस्यांचे निवारण करतो, असा दावा बाबाचे भक्त करत होते. त्याअनुषंगाने पोलिसांनी पंचशीलनगर येथे सापळा रचत बाबाच्या दरबारात धाड टाकली. विशेष म्हणजे, राज्यात टाळेबंदीबाबतचे कठोर निर्बंध असतानाही यावेळी तेथे 50 पेक्षा जास्त भक्तमंडळी गर्दी करून होते.

बाबाच्या अंगात शेषनाग संचारलेला

यावेळी बाबाच्या अंगात शेषनाग संचारल्याने तो जमिनीवर सापासारखा आळोखेपिळोखे देत फुसफुस करत होता. मात्र, पोलीस दिसताच त्याचे फुसफुसणे अचानक बंद झाले. बाबा कोरोना संक्रमित रुग्णांना क्षणार्धात कोरोनामुक्त करतो, असे भक्त यावेळी सांगत होते. अशाच तऱ्हेने बाबा लोकांना स्वत:मध्ये दैवी शक्ती असल्याचे सांगून भीती दाखवत होता. मात्र, पोलिसांच्या अचानक झालेल्या उपस्थितीने त्याचा दैवी चमत्कार दूर पळून गेला.

ढोंगीबाबा विरोधात गुन्हा दाखल

यावेळी पोलिसांनी बाबाला जादूटोणाविरोधी कायदा, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा 2013 नुसार अटक केली. यासोबतच लॉकडाऊनमध्ये भक्तांना गोळा केल्याचा गुन्हाही त्याच्याविरोधात दाखल करण्यात आला.

हेही वाचा :

घरातील महागड्या वस्तू, अंगावरील दागिने जशास तसे, तरीही वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात, आरोपींनी महिलेला का मारलं?

भर दिवसा रस्त्यावर थरार, दोन गुंड आमनेसामने, दोघांमध्ये संघर्ष, कुख्यात गुंडाची हत्या

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.