Bhandara Crime | चुलत भावानेच केला व्यापाऱ्याचा गळा चिरून खून, नागपुरच्या हार्डवेयर व्यापाऱ्याची भंडाऱ्यात हत्या!

पोलिसांचा फोन आल्यानंतर संदेशने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत आपण एकटेच ब्रम्हपुरी येथे असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या बोलण्यात पोलिसांना तफावत आढळल्याने पोलिसांनी त्याला नागपुर येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी खाकीचा हिसक्या दाखवताच संदेशने गुन्हा कबूल केला आणि आपणच अनिकेशची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

Bhandara Crime | चुलत भावानेच केला व्यापाऱ्याचा गळा चिरून खून, नागपुरच्या हार्डवेयर व्यापाऱ्याची भंडाऱ्यात हत्या!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 11:59 AM

भंडारा : नागपुरच्या (Nagpur) हार्डवेयर व्यापाऱ्याचा भंडाऱ्यात गळा चिरून खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडालीयं. विशेष म्हणजे पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपीला अटक (Arrested) देखील केलीयं. या व्यापाऱ्याचा गळा चिरून खून त्याच्याच चुलत भावाने केल्याचे पोलिस (Police) तपासात उघड झालायं. या चुलत भावाला नागपुर येथून जेरबंद केले आहे. संदेश राजेंद्र क्षीरसागर (24) रा. साईकृष्णा रेसिडेन्सी, पिपला हुडकेश्वर, नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या खून प्रकरणानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलायं.

जंगलात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

मृतक अनिकेश पंजाबराव क्षीरसागर (49) रा. उदयनगर नागपूर याचा भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील लेंडेझरी जंगलातील नेरला ते इटगाव मार्गावर गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिस तपास सुरू केला. अड्याळ येथील एका दुकानात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून अनिकेशचा चुलतभाऊ संदेश क्षीरसागर याच्याशी पोलिसांनी संपर्क साधला.

हे सुद्धा वाचा

चुलत भावानेच केली व्यापाऱ्याची हत्या

पोलिसांचा फोन आल्यानंतर संदेशने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देत आपण एकटेच ब्रम्हपुरी येथे असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या बोलण्यात पोलिसांना तफावत आढळल्याने पोलिसांनी त्याला नागपुर येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी खाकीचा हिसक्या दाखवताच संदेशने गुन्हा कबूल केला आणि आपणच अनिकेशची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

प्रवास करताना डब्बा खाण्यासाठी गेले होते जंगलात

अनिकेश याला जंगलात जेवणाची आवड होती. त्यामुळे कुठेही बाहेरगावी जायचे असल्यास तो सोबत डब्बा घायचा आणि जंगलात चांगली जागा पाहून त्याठिकाणी जेवण करायचा. घटनेच्या दिवशी ही तो आपला चुलत भाऊ संदेश सोबत कारने निघाला होता आणि सोबत डब्बा देखील होता. इटगाव जंगलात रस्त्यावर कार उभी करून अनिकेश व संदेश दोघेही जेवायला बसले. डब्यातील तेलाचे डाग पुसण्यासाठी झाडाची पाने आणतो, असे सांगून संदेश थोडा दूर गेला. काही वेळात त्याने आपल्या बॅगमधील शस्त्र काढून अनिकेशचा गळा चिरल्याचे पोलिसांना सांगितले.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.