महिनाभरापूर्वी लग्न, विवाहबाह्य संबंधांचा संशय, दोन नववधूंची पतीकडून हत्या
दोन्हा घटनांमध्ये एक साम्य आहे आणि ते म्हणजे दोन्हीही नवविवाहित महिलांची हत्या त्यांच्याच पतीने केली आहेत.
नागपूर : नवीन लग्न होऊन सुखीसंसारची स्वप्न पाहणाऱ्या दोन नवविवाहितांची नागपूरमध्ये (Nagpur Two Murder In Three Days) हत्या करण्यात आली. दोन घटना वेगवेगळ्या भागात घडल्या. महत्वाचं म्हणजे या दोन्ही घटनेत हत्यारे पतीचं आहे. मात्र, अशा प्रकारे तीन दिवसात दोन घटना घडल्याने खळबळ माजली आहे (Nagpur Two Murder In Three Days).
नागपूरमध्ये खून होणे काही नवीन नाही. पण, गेल्या 3 दिवसात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये एक साम्य आहे आणि ते म्हणजे दोन्हीही नवविवाहित महिलांची हत्या त्यांच्याच पतीने केली आहेत. पहिली घटना ही हिंगणा परिसरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (16 फेब्रुवारी) घडली होती. तर, आज (17 फेब्रुवारी) पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कापसी भागात सुद्धा एक नवऱ्याने आपल्या बायकोला संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
पहिली घटना :
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगरच्या इसासनी भागात घडली आहे. अनैतिक सबांधामुळे निर्माण झालेल्या वादातून नवऱ्याने बायकोचा गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणातील मृतक दिप्ती अरविंद नागमोती आणि आरोपी नागमोती यांचे लग्न 5 जानेवारी रोजी म्हणजे सुमारे सव्वा महिन्यांपूर्वी झाले होते. ते नव्यानेच ईसासनी भागात राहायला आल्याने त्यांना शेजारचे देखील ओळखत नव्हते. आरोपी अरविंद हा एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत वेल्डिंगचे काम करायचा. मात्र, दिप्तीचा खून केल्यानंतर तो पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत
दुसरी घटना :
पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्या महिलेचा खून झाला आहे. तिचं लग्न चार महिन्यापूर्वीच झालं होतं. तिचा खून देखील तिच्या नवऱ्याने केल्याचा खुलासा झाला आहे. मृतक महिलेचे नाव ज्योती मारखडे असे आहे. तर, तिच्या नवऱ्याचे नाव ललित मारखडे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्योती आणि ललितचे लग्न तीन महिन्यांपूर्वी झाले होते. ते दोघेही एका आरा मशीनच्या कारखान्यात कामाला होते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र, त्यानंतर सर्व सुरळीत सुरु असताना रात्री ललितने ज्योती झोपलेली असताना तिच्या डोक्यावर लाकडाने वार करुन तिचा खून केला. घटनेची माहिती समजताच पारडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला आहे. पोलिसांनी आरोपी ललित ला देखील अटक केली आहे (Nagpur Two Murder In Three Days).
या घटनेतील परिवार हे अत्यंत गरीब परिस्थितीतील असून पोट भरण्यासाठी नागपुरात आलेले आहे. मात्र, अशा प्रकारे घडलेल्या नागपुरातील गुन्हेगारी वाढविण्यात हातभार लावताना दिसत आहे.
पतीकडून पत्नीच्या वडील आणि भावाची हत्या; पत्नीचे अपहरण करून आरोपी पसार#amaravaticrime #amaravatiKidnappingWifehttps://t.co/YlvzYGbGBY
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2021
Nagpur Two Murder In Three Days
संबंधित बातम्या :
15 दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर, पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळला पुन्हा अटक
एकाच गावातील तरुण-तरुणीची एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या