नांदेड : नांदेडच्या हणेगाव येथील एका कापड व्यावसायिकाच्या मुलीने बटाईदाराच्या मुलासोबत प्रेमसंबंधातून पळून जाऊन लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मुलीच्या कुटुंबियांनी तिच्यासह तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार केली आहे. मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळून जाताना घरातील 72 लाखांचे दागिने आणि 25 लाखांची रोख रक्कम घेऊन गेल्याचा दावा मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. दुसरीकडे मुलीने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. याबाबत मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण ‘टीव्ही 9 मराठी’ या व्हिडीओची पुष्टी करत नाही. या व्हिडीओत तरुणी आपल्या कुटुंबियांचे सर्व आरोप फेटाळत आहे. याशिवाय आपल्या कुटुंबियांपासून आपल्या आणि पतीच्या जीवाला धोका असल्याचा आरोप मुलीने केला आहे (Nanded girl viral video said I converted to Islam of my own free will).
“मी माझ्याच गावाचा तरुण इशाद मोइनोद्दीन अत्तार याच्यावर प्रेम करते. ही गोष्ट माझ्या कुटुंबियांना गेल्या पाच वर्षांपासून माहित आहे. पण ते जेव्हा आमच्या लग्नाला नकार देत होते तेव्हा आम्ही दोघांनी मिळून हैदराबादला येऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. मी 1 मार्चला इथे आली. मी त्याचदिवशी माझ्या मर्जीने इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही दोघांनी निकाह केला”, असं तरुणी व्हिडीओत बोलताना दिसत आहे (Nanded girl viral video said I converted to Islam of my own free will).
“आता या लग्नानंतर माझ्या कुटुंबियांपासून मला, माझ्या पतीला आणि पतीच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मी तेलंगणा राज्याच्या पोलिसांना विनंती करते की, त्यांनी आमच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. तसेच महाराष्ट्र पोलीस इथे आले आहेत. मी महाराष्ट्रात त्यांच्यासोबत जावं आणि तिथे त्यांनी माझा जबाब नोंदवावा, अशी महाराष्ट्र पोलिसांची भूमिका आहे. मात्र, मी तिथे गेली तर माझ्या जीवास धोका आहे. माझ्यासह पतीच्याही जीवाला धोका आहे. त्यामुळे मला जबाब द्यायचा असेल तर मी इथेच जबाब देईन”, अशी भूमिका तिने मांडली.
“माझे कुटुंबिय माझ्यावर खोटा आरोप करत आहेत. मी सोनं किंवा पैसा घेऊन आलेली नाही. हे सर्व आरोप खोटे आणि अर्थहीन आहेत. माझे कुटुंबिय मला वारंवार भीती दाखवून छळत आहेत. याशिवाय महाराष्ट्र पोलिसांकडूनही आमचा छळ सुरु आहे. मी हैदराबादेतील समर्थनगर पोलीस ठाण्यात जबाब दिला आहे. यापुढेही मी या पोलीस ठाण्यात जबाब देणार. महाराष्ट्रात जाणार नाही. तेलंगणा पोलिसांनी मला आणि माझ्या पतीची सुरक्षा करावी, अशी माझी विनंती आहे”, अशी तरुणी व्हिडीओत बोलते.
मुलीचा व्हायरल होणारा व्हिडीओ बघा :
नांदेडच्या हणेगाव येथील एका कापड व्यावसायिकाच्या मुलीने बटाईदाराच्या मुलासोबत प्रेमसंबंधातून पळून जाऊन लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, मुलीच्या कुटुंबियांनी तिच्यासह तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार केली आहे. pic.twitter.com/QguTml87Sj
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) July 8, 2021