निवडणूक काळात लोखंडी पेट्यांमधून घेऊन जात होता एक कोटी रुपयांची रोकड, पोलिसांच्या नजरेत आला अन्…
How Much Cash Are You Allowed To Carry During Elections: वाहनामध्ये सापडलेल्या रक्कमेबाबत वाहन चालकाकडे पोलिसांनी खुलासा मागितला. परंतु त्या वाहन चालक योग्य खुलासा दिला नाही. यामुळे ही रक्कम पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर यासंदर्भात निवडणूक आयोगाला कळवले आहे.
राज्यात निवडणूक आचारसंहिता सुरु आहे. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक आयोगाची भरारी पथके अन् पोलिसांचा बंदोबस्त आहे. ठिकाणठिकाणी तपासणी केली जात आहे. निवडणुकीतील गैरप्रकर रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोकड घेऊन जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ठिकाठिकाणी मोठ्या प्रमाणवर रोकड आणि दगिने सापडत आहे. आता नांदेड पोलिसांनी एक कोटी पाच लाखांची रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम कोणाची, या रक्कमेचे काही पुरावे आहेत का, रक्कम कोठून कुठे जात होती? त्याची चौकशी पोलीस आणि आयकर विभागाचे अधिकारी करत आहेत.
तपासणी केली अन्…
नांदेड पोलिसांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील तपासणी नाक्यावर एक कोटी पाच लक्ष रुपयांची रक्कम पकडली आहे. ही रक्कम भाग्यनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या तपासणी नात्यावर पकडली आहे. तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू असताना एक चार चाकी वाहनाचा पोलिसांना संशय आला. या वाहनाची तपासणी करत असताना लोखंडी पेट्यांमध्ये ठेवलेले एक कोटी पाच लक्ष रुपये पोलिसांना आढळून आले.
रक्कमेचे स्पष्टीकरण न दिल्याने जप्त
वाहनामध्ये सापडलेल्या रक्कमेबाबत वाहन चालकाकडे पोलिसांनी खुलासा मागितला. परंतु त्या वाहन चालक योग्य खुलासा दिला नाही. यामुळे ही रक्कम पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर यासंदर्भात निवडणूक आयोगाला कळवले आहे. ही रक्कम कुठून आली, कुठे जात होती, हे कुणाची रक्कम आहे याबाबत आता पोलिसांचा तपास सुरू आहे, असे नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले.
रोकड नेण्याचे काय आहे नियम
निवडणूक काळात निवडणूक आयोगाच्या आचारसंहितानुसार ५० हजारापर्यंतची रक्कम कोणत्याही पुराव्याशिवाय नेता येते. परंतु त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास त्याचा पुरावा सोबत हवा. तसेच एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी रोकड नेताना दोन्ही ठिकाणी त्याचे रेकॉर्ड ठेवणे गरजेचे आहे.