‘घरच्या भांडणात पोलीस लक्षच घालत नाहीत…’ नांदेड एसपी ऑफिससमोर एकानं पेटवून घेतलं..
आजच्या घटनेत पेटवून घेतलेल्या पिराजीने खिशात पेट्रोलची बॉटल आणली होती, असा दावा पोलिसांनी केलाय. तर मला पेट्रोल बाहेरून एकाने आणून दिलंय असा दावा पिराजीने केलाय. मात्र एसपी ऑफिसमध्ये पेट्रोल आणले कसे आणि उपस्थित कर्मचारी काय करत होते असा सवाल आता उपस्थित होतोय.
नांदेडः घरगुती वादाकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत एका नागरिकाने नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात (Nanded SP Office) स्वतःला पेटऊन घेतलंय. कार्यालयात असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच आवरल्याने पेटवून घेणारा नागरिक बचावलाय. दरम्यान त्याने चक्क पेट्रोल आणून स्वतःला पेटवले. त्यात त्याचे शरीर भाजल्याने त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं. मुदखेड (Mudkhed) तालुक्यातील मुगट जवळच्या खांबाळा गावातील रहिवाशी असलेल्या पिराजी मडपल्लेवार, अशी या पेटवून घेणाऱ्या नागरिकांची ओळख आहे. किरकोळ घरगुती वादातून त्याने पोलीस ठाण्यात (Police Station) अदखलपात्र गुन्ह्याची दुपारी नोंद केली होती. त्यानंतर तातडीने कारवाई होत नसल्याचे पाहून त्याने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत स्वतःला पेटवलं. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येजा करताना मोठी नियमावली असली तरी हा 50 वर्षीय पेट्रोल घेऊन कार्यालय आवारात शिरलाच कसा, असा प्रश्न आता निर्माण होतोय.
एसपी ऑफिस किती सुरक्षित?
नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक हे वजीराबाद इथल्या मुथा चौकात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहे. इथून जवळच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद , बसस्टँड , रेल्वेस्टेशन आणि वजीराबाद पोलीस ठाणे आहे. त्यामुळे आजूबाजूला काहीही घटना घडली की लोक तात्काळ न्याय मिळवण्याच्या हेतूने एसपी ऑफिस गाठत असतात. त्यातून पोलिसांनी एसपी ऑफिसमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचीच नोंद ठेवण्यास सुरुवात केलीय. त्यातून काही अंशी एसपी ऑफिसमध्ये येणारी गर्दी कमी झालीय. मात्र तरीही आज सांयकाळी चार वाजण्याच्या आसपास आग लावून घेतल्याची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतेय.
‘घरच्या भांडणात पोलीस लक्षच घालत नाहीत…’ नांदेड एसपी ऑफिससमोर एकानं पेटवून घेतलं.. pic.twitter.com/CRTIgOcqR6
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 15, 2022
यापूर्वीही घडली होती घटना
थेट एसपी ऑफिसमध्ये येऊन स्वतःला पेटवल्याची नांदेडमधली आजची काही पहिली घटना नाही. यापूर्वी एका वर्षांपूर्वी स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न मुखेडच्या एका शेतकऱ्यांने केला होता. त्या नंतर संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तीची व्यवस्थित नोंद आवक जावक विभागात ठेवण्यात येऊ लागली. मात्र तरीही आजच्या घटनेने एसपी ऑफिसमध्ये खळबळ उडालीय.
पिराजीने पेट्रोल आणलेच कसे ?
आजच्या घटनेत पेटवून घेतलेल्या पिराजीने खिशात पेट्रोलची बॉटल आणली होती, असा दावा पोलिसांनी केलाय. तर मला पेट्रोल बाहेरून एकाने आणून दिलंय असा दावा पिराजीने केलाय. मात्र एसपी ऑफिसमध्ये पेट्रोल आणले कसे आणि उपस्थित कर्मचारी काय करत होते असा सवाल आता उपस्थित होतोय. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात येजा करणाऱ्या व्यक्तींसाठी निर्बंध लादल्यानंतर मान अपमान नाट्यही चांगलेच रंगले होते. विशेषतः पत्रकार आणि राजकीय व्यक्तींना नोंद करून जाण्याच्या पद्धतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता अश्या लोकांना आवर घालावा तरी कसा सवाल पोलिसांना पडलाय.