AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | पाटाच्या पाण्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला; मंत्री दानवेंचा नातेवाईक असल्याची चर्चा

अभिषेक कैलास खरात हा नाशिकमधील के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सच्या शेवटच्या वर्गात शिकत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अभिषेक बेपत्ता होता. तशी तक्रार अभिषेकचा चुलत भाऊ सूरज खरात याने आडगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिषेक याचा शोध सुरू केला होता.

Nashik | पाटाच्या पाण्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला; मंत्री दानवेंचा नातेवाईक असल्याची चर्चा
नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडालीय.
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 4:01 PM

नाशिकः नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह पाटाच्या पाण्यात सापडल्याने खळबळ निर्माण झाली आहे. हा घातपात आहे की, आत्महत्या याची चर्चा सुरूय. अभिषेक खरात (Abhishekh Kharat) असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danave) यांचा नातेवाईक असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तालुक्यातील सय्यैद पिंप्री (Sayyad Pimpri) येथील पाटाच्या पाण्यात हा मृतदेह सापडल्याचे समजते. यानंतर ग्रामीण पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत या विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला. सध्या शवविच्छेदनासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, मृत्यू कशाने झाला हे अजूनस समोर आले नाही.

नेमके प्रकरण काय?

अभिषेक कैलास खरात हा नाशिकमधील के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सच्या शेवटच्या वर्गात शिकत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अभिषेक बेपत्ता होता. तशी तक्रार अभिषेकचा चुलत भाऊ सूरज खरात याने आडगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिषेक याचा शोध सुरू केला होता. मात्र, आज सकाळी अकराच्या सुमारास तालुक्यातील सय्यैद पिंपरी येथे पाटाच्या पाण्यात एका मुलाचा मृतदेह सापडला.

प्राथमिक अंदाज काय?

पाटाच्या पाण्यात मृतदेह सापडल्याची बातमी पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी येऊन पाहणी केली असता, हा मृतदेह बेपत्ता अभिषेक खरात याचा असल्याचे समोर आले. त्यांनी हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अभिषेकने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, तपास केल्याशिवाय ठोस निष्कापर्यंत पोहचता येणार नसल्याचेही सांगितले आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा विद्यार्थी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा नातलग असल्याचे समजते.

पालकांनो मुलाकडे लक्ष ठेवा

अभिषेकने आत्महत्या केली की, घातपात हे समोर येईलच. मात्र, इतर पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष ठेवायला हवे. आपला मुलगा काय करतो, तो कॉलेजला जातो का, त्याचे मित्र कोण आहेत, त्याची संगत कशी आहे, त्याच्या सवयी काय आहेत याची माहिती त्यांना असावी. मुलगा आणि पालकांमध्ये मैत्रीचे नाते असेल, तर आपण आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीतून आणि संकटातून बाहेर काढू शकतो, अन्यथा उशीर झाल्यानंतर काहीही करू शकणार नाही.

इतर बातम्याः

Nashik | गाडगेबाबांच्या धर्मशाळेत 85 वर्षांपासून अविरत अन्नछत्र; वंचिताचा अनोखा आधारवड!

कोट्यवधींची उड्डाणे घेणाऱ्या साहित्य संमेलनाचा हिशेब द्या; नाशिकमध्ये निमंत्रकांना घरचा आहेर

Nashik Corona | कोरोना संपलाय म्हणता ना, पण नाशिकमध्ये पुन्हा 10 मृत्यू!

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.