Igatpuri Youth Suicide : मुंबईतील तरुणाचा इगतपुरीतील उंटदरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
सदर तरुण मुंबईतील असून इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिरा समोरील असलेल्या 150 ते 200 फूट उंटदरीत त्याने उडी घेतली. दरीत उडी घेतल्यानंतर तरुण गंभीर जखमी झाला आहे. युवक एका कपारीत अत्यंत जखमी अवस्थेत त्यांना आढळला. युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक : मुंबईतील एका तरुणा (Youth)ने इगतपुरीतील उंटदरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. एका रिक्षाचालकाने तरुणाला दरीत उडी घेताना पाहिल्यामुळे ही घटना उघडकीस आली. रिक्षा चालकाने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच इगतपुरी पोलीस, रूट पेट्रोलिंग टीम घटनास्थळी दाखल झाली. युवकास दरीतून काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीमला करण्यात पाचारण आले. राष्ट्रवादीचे उपजिल्हा अध्यक्ष महेश शिरोळे यांनी दरीत उतरून युवकाचा शोध घेतला. (A young man from Mumbai attempted suicide by jumping into a oontvalley in Igatpuri)
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
सदर तरुण मुंबईतील असून इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिरा समोरील असलेल्या 150 ते 200 फूट उंटदरीत त्याने उडी घेतली. दरीत उडी घेतल्यानंतर तरुण गंभीर जखमी झाला आहे. युवक एका कपारीत अत्यंत जखमी अवस्थेत त्यांना आढळला. युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, तरुणाची ओळख अद्याप पटली नसून पोलिस ओळख पटविण्याचे काम करत आहेत. तसेच तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न नेमका का केला याचाही पोलिस तपास करीत आहेत.
नाशिकमध्ये कंपनीतून निलंबित केल्यामुळे कामगाराची आत्महत्या
कंपनीतून निलंबित केल्यामुळे आर्थिक विवंचनेतून एका कामगाराने आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या सिडको परिसरात शुक्रवारी उघडकीस आली आहे. निलंबनामुळेच कामगाराने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाची चौकशी करण्याची मागणीही कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेमुळे कंपनीतील इतर कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. (A young man from Mumbai attempted suicide by jumping into a oontvalley in Igatpuri)
इतर बातम्या
Firing : लष्कराच्या जवानाकडून चुकून गोळीबार, दोन नागरिक जखमी; अरुणाचल प्रदेशातील खळबळजनक घटना