हालचालींना जोरदार वेग, तपासाचे जोरदार सत्र, ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी आणखी वाढल्या

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयत. सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात नुकतंच भाजप आमदार नितेश राणे यांनी भर अधिवेशनात गंभीर आरोप केले. त्या आरोपांनंतर नाशिक पोलिसांनी बडगुजर यांची चौकशी केली. त्यानंतर आता एसीबी चौकशीचा ससेमिरा सुधाकर बडगुजर यांच्यामागे लागला आहे.

हालचालींना जोरदार वेग, तपासाचे जोरदार सत्र, ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी आणखी वाढल्या
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 9:54 PM

पुणे | 17 डिसेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमधील बडे नेते, ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. सुधाकर बडगुजर यांच्यामागे तब्बल दोन प्रकरणांचा चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे आगामी काळ बडगुजर यांच्यासाठी कठीण असण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. बडगुजर यांच्याविरोधात आता एसीबी विभाग आक्रमक झालंय. एसीबीचं एक पथकच बडगुजर यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं आहे. त्यामुळे बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे एसीबीच्या तक्रारीनुसारच आज बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर आता एसीबीचा तपासाचा वेग वाढला आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी अधिवेशनात विधानसभेत सुधाकर बडगुजर यांचे काही फोटो सादर केले होते. त्यांनी बडगुजर यांच्या एका पार्टीत नाचतानाचा व्हिडीओदेखील जारी केला होता. या व्हिडीओत बडगुजर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या सलीम कुत्ता याच्यासोबत नाचताना दिसत आहेत. सलीम कुत्ता हा मुंबई 1993 बॉम्बस्फोट हल्ला प्रकरणातील आरोपी आहे. त्याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अशा व्यक्तीसोबत बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला.

बडगुजर यांच्याविरोधात एसीबीची कारवाई का?

नितेश राणे यांच्या आरोपांनंतर सुधाकर बडगुजर यांना तातडीने नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावलं होतं. त्यानंतर सुधाकर बडगुजर चौकशीसाठी नाशिक पोलीस ठाण्यातही दाखल झाले. या सगळ्या घडामोडींदरम्यान सुधाकर बडगुजर यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक अर्थात एसीबी विभागाचं एक पथक दाखल झालं आहे. बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर एसीबीचं पथक बडगुजर यांच्या निवासस्थानी दाखल झालं आहे. बडगुजर यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. त्यानंतर आता एसीबीकडून चौकशी सुरु झालीय.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बडगुजर यांनी 2016 साली पदाचा गैरवापर करुन कंपनीला महापालिकेचा ठेका घेतला, असा त्यांच्यावर आरोप आहे. गेल्या काही महिन्यांपासून बडगुजर यांची चौकशी सुरु होती. या दरम्यान सलीम कुत्ता प्रकरणावरुनही त्यांची पोलीस चौकशी करत होते. असं असताना आता एसीबी अॅक्शनमोडवर आल्याने बडगुजर यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र दिसत आहे.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.