नाशिक पोलिसांकडून तथाकथिक ‘भाई’चा बंदोबस्त, जेलमधून सुटून आला आणि पुन्हा जेलमध्येच गेला

नाशिक पोलिसांनी एका तथाकथित भाईचा चांगलाच बंदोबस्त केला आहे. हा भाई वर्षभर जेलमध्ये होता. त्याची नुकतीच सुटका झाली होती. तो जेलमधून सुटला म्हणून त्याच्या समर्थकांनी आणि नातेवाईकांनी त्याची जंगी मिरवणूक काढली होती. पण हीच मिरवणूक त्या तथाकथित भाईच्या अंगलटी आली आहे. पोलिसांनी त्या भाईला पुन्हा जेलमध्येच टाकलं आहे.

नाशिक पोलिसांकडून तथाकथिक 'भाई'चा बंदोबस्त, जेलमधून सुटून आला आणि पुन्हा जेलमध्येच गेला
जेलमधून सुटून आला आणि पुन्हा जेलमध्येच गेला
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 8:11 PM

कारागृहातून सुटून आलेल्या भाईला पुन्हा एकदा कारागृहात पाठवण्यात आलंय. कारागृहातून सुटललेल्या या गुन्हेगाराची नाशिक शहरात काढलेली जंगी मिरवणूक आणि सत्कार चांगलाच महागात पडला आहे. या संपूर्ण मिरवणुकीचा आणि या सत्कार सोहळ्याचा व्हिडियो सोशल मीडियावर टाकला आणि पोलिसांच्या हाती लागताच सुमोटो कारवाई अंतर्गत या तथाकथित भाईला पुन्हा पोलिसांनी जेलवारीला पाठवले.

नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हर्षदला जुलै २०२३ मध्ये एमपीडीए कायद्यानुसार नाशिक रोड कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केले होते. त्यानंतर हर्षदची मंगळवारी कारागृहातून सुटका झाली. त्यामुळे बेथेलनगर येथील त्याच्या मित्रपरिवारासह समर्थकांनी त्याच्या स्वागत मिरवणुकीचं नियोजन केलं. त्यानुसार मंगळवारी दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास बेथेलनगर, आंबेडकर चौक, साधु वासवानी रोड, शरणपूर रोड या मार्गावर कारमधून (क्र. एमएच १५, जीएक्स ८७२१) हर्षदची मिरवणूक काढली.

पोलिसांनी कशी केली कारवाई?

या मिरवणुकीत आरोपी हर्षदच्या मित्रपरिवाराने आणि समर्थकांनी आरडाओरड करीत अर्वाच्च घोषणाबाजी केली. वाहनांचा विनाकारण हॉर्न वाजवत दहशत करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित पाटणकरसह मिरवणुकीत सहभागी असलेल्या 7 जणांवर गुन्हा दाखल केला.

या आधीही कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांसह त्यांच्या समर्थकांनी शहरात मिरवणुका काढत गुन्हेगारीचे उद्दात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्याचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली होती, तरीदेखील असे प्रकार सुरूच आहेत. त्याचप्रमाणे असे रील्स टाकून प्रतिस्पर्धी टोळ्यांनाही अप्रत्यक्षरीत्या आव्हान देण्याचे प्रकार होत असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.