नाशिकमध्ये गॅसच्या स्फोटात स्वयंपाकी ठार

नाशिकमध्ये (Nashik)गॅस गळतीमुळे (GAS Leak)झालेल्या स्फोटात Nashik Blast)एका स्वयंपाक्याचा जागीच मृत्यू झाला. हॉटेल (Nashik Hotel)रामा हेरिटेजमध्ये ही घटना घडली.

नाशिकमध्ये गॅसच्या स्फोटात स्वयंपाकी ठार
गॅस बुक करण्यासाठी प्रथम तुम्हाला बुक गॅस सिलेंडरवर क्लिक करावे लागेल. यानंतर आपला गॅस पुरवठादार जे एचपी किंवा भारत किंवा इंडेन असेल ते निवडा. तुमचा मोबाईल नंबर, एलपीजी आयडी आणि ग्राहक क्रमांक टाका. आता तुमचा पेमेंट मोड निवडा. यामध्ये तुम्ही पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड्स, नेट बँकिंग निवडू शकता. आपण इच्छित असल्यास, आपण पेटीएम पोस्टपेड पर्याय देखील निवडू शकता. भरणा केल्यावर, तुमचे गॅस सिलेंडर बुक केले जाईल.
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 3:58 PM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) गॅस गळतीमुळे (GAS Leak)झालेल्या स्फोटात Nashik Blast) एका स्वयंपाक्याचा जागीच मृत्यू झाला. हॉटेल (Nashik Hotel)रामा हेरिटेजमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात (Nashik Mumbainaka Police)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Explosion due to gas leak in Nashik, cook killed on the spot)

जुन्या मुंबई-आग्रा रोडवरील हॉटेल रामा हेरिटेजमध्ये शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गॅस गळती झाली. गॅस गळतीमुळे स्फोट झाला. त्यात रूपेश गायकवाड या स्वयंपाक्याचा जागीच मृत्यू झाला. स्फोट इतका भीषण होता की, त्याचा आवाज दूरवर गेला. हॉटलेच्या किचनमधील साहित्याची नासधूस झाली. रूपेश यांचा मृत्यू स्फोटामुळे नव्हे, तर घातपातामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मुबईनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी सीसीटीव्हीची पाहणी केली. तेव्हा गॅस गळतीमुळेच स्फोट झाल्याचे निदर्शनास आले. रूपेश गायकवाड यांनी स्टोअर रूममध्ये प्रवेश करून विजेच्या दिव्याचे बटण लावले. त्यानंतर तात्काळ स्फोट झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अग्निशमन दलाची धाव

घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाने बंबासह दुर्घटनेस्थळी धाव घेतली. दोन बंबाच्या मदतीने जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझवली. या वेळी हॉटेल परिसरात गर्दी झाली होती. संतप्त नातेवाईकांनी रूपेशचा मृत्यू घातपातामुळे झाला आहे. रूपेशच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. या कुटुंबाला मदत करावी, अशी मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्यांचा राग शांत झाला.

संशयावरून तरुणावर वार

दरम्यान, दुसऱ्या घटनेत नाशिकमधील गंगापूर रोडजवळील प्रमोद महाजन उद्यानाजवळ एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून हा हल्ला झाल्याचे समजते. या घटनेत राहुल शहाजी निखाडे (वय २२) हा तरुण जखमी झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Explosion due to gas leak in Nashik, cook killed on the spot)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये महिनाभरात 9 दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू, गुरुवारपासून कडक हेल्मेट सक्ती

नाशिकरोडला दारणाचे पाणी, कळवणला सौरऊर्जेवर पाणीपुरवठा 

नाशकात तोतया विधानसभा उपाध्यक्षाला बेड्या

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.