एक रेल्वे गार्ड, एक फोटो, अन् जगलाल यांना काळजाचा तुकडा मिळाला; मनमाड स्टेशनवर मुलीच्या अपहरणाचा कट उधळला

एका व्यक्तीने आपले काम चोख केले, तर जीव वाचू शकतो आणि जावूही शकतो. आयुष्य सुंदर होऊ शकते आणि उद्धवस्तही. त्यामुळेच एका व्यक्तीने कुठेही खूप मोठा फरक पडतो.

एक रेल्वे गार्ड, एक फोटो, अन् जगलाल यांना काळजाचा तुकडा मिळाला; मनमाड स्टेशनवर मुलीच्या अपहरणाचा कट उधळला
सौजनः गुगल.
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 10:25 AM

नाशिकः नशीब, लक कोणी मानतात. कोणी मानत नाहीत. मात्र, काही-काही घटना अशाच अकस्मात उलगडतात. त्यांचे बिंग फुटते. अन् खूप काही तरी चांगले घडते. अशा व्यक्ती त्या अनाम शक्तीचे हात जोडतात. नशिबावर विश्वास ठेवतात. असेच काही त्या मुलीबद्दल घडले. अन् मनमाड रेल्वे स्थानकावरून होणारे तिचे अपहरण टळले. अन्यथा पुढे तिचे काय झाले असते, माहित नाही. खरे तर कल्पनाही करवत नाही.

त्याचे झाले असे की…

मनमाड रेल्वे स्टेशनवरील गाड्यांचा राबता, प्रवाशांची गर्दी आणि त्यातही सध्या बस बंद असल्याने अनेकांची रेल्वेवर असलेली मदार हे सारे आपल्याला माहित आहेच. अशीच परिस्थिती असताना महाराष्ट्र एक्स्प्रेसवर गार्डची ड्युटी संपवून सर्वेश यादव न्यायडोंगरी रेल्वे स्थानकावर उतरले. मात्र, स्टार्टर सिग्नल फेल झालेले. त्यामुळे स्टेशनवर अनेक गाड्या थांबवलेल्या. तितक्या हावडा-मुंबई एक्स्प्रेसमधून एक महिला उतरली. तिच्यासोबत तीन वर्षांची मुलगीही होती. त्या दोघीही स्टेशनवर उभ्या असलेल्या सचखंड एक्स्प्रेसमध्ये जावून बसल्या. हे नित्याचे. असेच होतच असते.

पुढे एक बातमी समजली

मनमाड रेल्वे स्टेशनवरील स्टार्टर सिग्नलचे काम झाल्यानंतर उभ्या असलेल्या गाड्या आपापल्या ठिकाणाकडे रवाना झाल्या. मात्र, जगलाल पारो (वय 37) हे सुद्धा याच गाडीतून प्रवास करत होते. त्यांची लहान मुलगी अचानक बेपत्ता झाली. त्यांनी रेल्वे पोलिसांनाकडे तक्रार दिली. ही बातमी ड्युटी संपवून उतरलेले गार्ड सर्वेश यादव यांना समजली. अन् इथूनच सारी सूत्रे हलली. सापळा रचला गेला.

अशीही कर्तव्य दक्षता

सर्वेश यादव हे स्टेशनवर उतरले तेव्हा त्यांना एक महिला एसी कोचमधून उतरून सचखंडमध्ये बसताना दिसली होती. तिच्यासोबत फक्त लहान मुलगी होती. कोणतेही साहित्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी लगेच तिच्याजवळ जात तिची विचारपूस केली. सामान कुठे आहे, पती कोठे आहेत, अशा प्रश्नांचा भडिमार केला. मात्र, तिने एका म्हाताऱ्याकडे बोट दाखवले. यादवांची नजर वळताच पळ काढला. मात्र, तिच्यासोबतची मुलगी रडत होती. त्यांनी त्या महिलेचा आणि मुलीचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये टिपला. त्यांना मुलगी बेपत्ता झाल्याचे समजले. तेव्हा हाच फोटो साऱ्यांना फॉरवर्ड केला. रेल्वे गार्डनी तपास करून त्या महिलेला मुलीसह ताब्यात घेतले आणि जगलाल पारो यांना त्यांच्या काळजाचा तुकडा मिळाला…हे नशीब, दैव, अजून काही माहित नाही. हां, आपण याला कर्तव्य दक्षता म्हणू शकतो. एका व्यक्तीने आपले काम चोख केले, तर जीव वाचू शकतो आणि जावूही शकतो. आयुष्य सुंदर होऊ शकते आणि उद्धवस्तही. त्यामुळेच एका व्यक्तीने कुठेही खूप मोठा फरक पडतो.

इतर बातम्याः

उत्तर महाराष्ट्रातले मायाजालः 240 कोटींचे घबाड सापडले; नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये छापे, 6 कोटींची रोकड, 5 कोटींचे दागिने जप्त

Viral Video | मस्ती करणं भोवलं, झोपाळ्यावर बसल्यानंतर माकडाची चांगलीच फजिती, मजेदार व्हिडीओ पाहिलात का ?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.