नाशिकः ग्रॅच्युटी, अर्जित रजेची रक्कम मिळेना; मृत कर्मचाऱ्याच्या कर्जबाजारी मुलाचा आत्मदहनाचा प्रयत्न

नाशिक (Nashik) जिल्ह्यातली ओझर (ता. निफाड) नगरपरिषद कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी आणि अर्जित रजेची रक्कम (Gratuity not paid) देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे वैतागलेल्या मृत कर्मचाऱ्याच्या मुलाने स्वतःला कोंडून घेत आत्मदहनाचा (self-immolation) प्रयत्न केला.

नाशिकः ग्रॅच्युटी, अर्जित रजेची रक्कम मिळेना; मृत कर्मचाऱ्याच्या कर्जबाजारी मुलाचा आत्मदहनाचा प्रयत्न
ओझर ग्रामपंचायत.
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 12:18 PM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातली ओझर (ता. निफाड) नगरपरिषद कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी आणि अर्जित रजेची रक्कम (Gratuity not paid) देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे वैतागलेल्या मृत कर्मचाऱ्याच्या मुलाने स्वतःला कोंडून घेत आत्मदहनाचा (self-immolation) प्रयत्न केला. (Gratuity not paid; Attempt of self-immolation in Ozar of dead employee’s son)

ओझर येथील जगन्नाथ गोविंद मंडलिक हे 30 मार्च 2019 रोजी निफाड तालुक्यातील ओझर नगरपरिषदेमधून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर साडेतीन वर्ष उलटून गेल्यानंतरही ग्रॅच्युटी आणि अर्जित रजेची रक्कम 5 लाख 49 हजार रुपये मिळत नसल्याने जगन्नाथ हे वैतागले होते. त्यांना 10 एप्रिल 2021 रोजी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाला. यात त्यांचे निधन झाले. उपचारासाठी पैसा नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ मुलावर आली. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी ही हक्काची रक्कम मिळावी म्हणून ओझर नगरपरिषदेकडे वारंवार पाठपुरावा करून ही रक्कम मिळत नसल्याने मुलगा दिनेश याने पेट्रोल बॉटल घेऊन स्वतःला कोंडून घेत आत्मदहनचा प्रयत्न केला. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठ दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आत्मदहन करण्याचा निर्णय अखेर मागे घेतल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

39 वर्षांची सेवा जगन्नाथ गोविंद मंडलिक यांनी नगरपरिषदेमध्ये तब्बल 39 वर्षे सेवा केली. या काळात सुट्टी असो, रात्र असो, की अजून काही. काम असले की त्यांना नगरपरिषदेमध्ये हजर रहावे लागायचे. इतर कामाला बाहेरही जावे लागायचे. तरीही निवृत्तीनंतर साडेतीन वर्षे लोटूनही त्यांना त्यांच्या हक्काची ग्रॅच्युटी आणि अर्जित रजेची टक्कम देण्यास टाळाटाळ केली जात होती. कोरोनाच्या लाटेत जगन्नाथ यांना कोरोना झाला. तेव्हा त्यांच्यावर उपचार करण्यासाठीही मुलांना उसनवारी करावी लागली. कारण रुग्णालयाचे बिल वाढत गेले. या काळातही मुलाने आपल्या वडिलांची हक्काची रक्कम मिळावी यासाठी नगरपरिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत. शेवटी वैतागलेल्या मुलाने टोकाचे पाऊस उचलत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. इतक्या वर्षे नोकरी करून हक्काचे पैसे मिळण्यासाठी असे करावे लागत असेल, तर या नोकरीला आणि प्रशासनाच्या वागणुकीला काय अर्थ, असी चर्चा सुरू होती. (Gratuity not paid; Attempt of self-immolation in Ozark of dead employee’s son)

इतर बातम्याः

कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यास मागता येईल दाद; पोलिसांविरुद्धच्या तक्रारीसाठी नाशिकमध्ये प्राधिकरण

महिला छेडछाडीचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच नाशिकमध्ये मारहाण

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.