AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गेस्टचा मृत्यू, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

विनोद तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला आणि खाली खोदकाम सुरु असलेल्या ठिकाणी असलेल्या मोठ्या दगडांवर आपटला. दगडावर आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या सर्व घटनेचे दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.

VIDEO : हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गेस्टचा मृत्यू, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गेस्टचा मृत्यू
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 10:42 PM

नाशिक : अंबड लिंक परिसरात हॉटेलचे नूतनीकरण एका गेस्टच्या जीवावर बेतले आहे. रूम पहायला गेलेल्या गेस्टचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. विनोद गीते असे मृत युवकाचे नाव आहे. अंबड लिंक रोडवरील एक्सलेन्स इन या हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

रुम उपलब्ध आहे का याबाबत विचारणा करण्यासाठी जाताना पडला

नाशिकमधील अंबड लिंक रोडवर एक्सलेन्स इन नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये नूतनीकरणाचे काम सुरु आहे. नूतनीकरणासाठी हॉटेलमधील काही भाग तोडण्यात आला आहे. काही ठिकाणी खोदकामही करण्यात आले आहे. याच दरम्यान आज विनोद गिते नामक एक तरुण काही कामानिमित्त नाशिक येथे आला होता. विनोद एक्सलेन्स इन हॉटेलमध्ये राहण्यासाठी रुम उपलब्ध आहे का यासाठी विचारणा करण्यासाठी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर गेला होता. तिसऱ्या मजल्यावरचा कॉरिडोअरजवळचा काही भाग नूतनीकरणासाठी तोडण्यात आला होता. विनोद रुमच्या चौकशीसाठी रिसेप्शन टेबलकडे जात असतानाच लक्षात न आल्याने कॉरिडोअररील तोडलेल्या भागातून तोल जाऊन खाली पडला.

तिसऱ्या मजल्यावरुन पडून खाली दगडावर आपटल्याने मृत्यू

खाली सुद्धा नूतनीकरणासाठी खोदकाम सुरु होते. विनोद तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला आणि खाली खोदकाम सुरु असलेल्या ठिकाणी असलेल्या मोठ्या दगडांवर आपटला. दगडावर आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या सर्व घटनेचे दोन सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा युवक तोडण्यात आलेल्या बांधकामात पडत असल्याचे दिसते. तर दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणात खाली पडत असल्याचे दिसत आहे. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान या घटनेबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. विनोद मूळचा कुठला आहे. तो नाशिकमध्ये कोणत्या कामासाठी आला होता. तसेच हॉटेलमध्ये नूतनीकरणाचे काम चालू असताना हॉटेल व्यवस्थापनाने पुरेशी सुरक्षेची काळजी घेतली नव्हती का याबाबत अधिक तपास सुरु आहे. (Guest dies after falling from third floor of hotel in hotel)

इतर बातम्या

Kalyan Crime: कल्याणमध्ये दुचाकी उभी करण्यावरुन वाद, पोलिसाला चौघांची बेदम मारहाण; दोघांना अटक, दोघे फरार

Boy Suicide: सनदी अधिकाऱ्याच्या मुलाची सहाव्या माजल्यावरुन उडी घेत आत्महत्या, घरी कुणी नसताना मुलाने उचलले टोकाचे पाऊल

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.