Igatpuri Accident : भरधाव थार मागच्या बाजूने कंटेनरच्या आत घुसली! मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, 1 ठार, 5 जखमी
Mahindra Thar accident : भरधाव वेगात असणारे महिंद्रा थार वाहन क्र. MP 09 WH 9936 हे पुढील बाजूचा कंटेनर क्र. MH46 AR 7417 याला पाठीमागून ठोकर मारून कंटेनरच्यामध्ये घुसल्याने अपघात झाला आहे. या अपघातात महिंद्रा थार गाडीचा चालक विश्वजीत सोगरा जागीच ठार झाला.
नाशिक : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील इगतपुरीजवळ (Igatpuri Accident) भीषण अपघात झाला. एका कारने मागच्या बाजूने येत कंटेनरचा जबरदस्त धडक दिली. यामध्ये एक जण ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. मुंबई-नाशिक हायवेच्या विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर हा अपघात घडला. पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर हायवेवर एकच खळबळ उडाली होती. मुंबई आग्रा (Mumbai Goa Highway) महामार्गावरील अपघात काही थांबायचं नाव घेत नसल्याचं या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. महिंद्रा थार गाडीच्या चालकाचा या अपघातामध्ये जागच्या जागी मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या निरीक्षण त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
5 जण थोडक्यात वाचले!
मुंबई आग्रा महामार्गांवर आठव्या मैल भागात आज पहाटे पवणेतीनच्या सुमाराला भरधाव थार आणि कंटेरनचा अपघात घडला. या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले. तर महिंद्रा थार या कारचा चालक जागीच ठार झाला. मुंबई नाशिक लेनवर विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर हा अपघात झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसूचकता दाखवलील. त्यांनी तातडीने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे पाच जणांचे प्राण थोडक्यात वाचलेत. मात्र या अपघातामध्ये महिंद्रा थार या कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय.
भरधाव वेगाचा बळी!
भरधाव वेगात असणारे महिंद्रा थार वाहन क्र. MP 09 WH 9936 हे पुढील बाजूचा कंटेनर क्र. MH46 AR 7417 याला पाठीमागून ठोकर मारून कंटेनरच्यामध्ये घुसल्याने अपघात झाला आहे. या अपघातात महिंद्रा थार गाडीचा चालक विश्वजीत सोगरा जागीच ठार झाला. आकाश ढोलपुरे, अहमद वसारी, अमित, अक्षय कानडे, शक्ती ठाकुर हे 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. महामार्ग पोलीस केंद्र घोटी, पिंपळगाव पेट्रोलिंग वाडीवऱ्हे व नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी मदतकार्यासाठी उपस्थित होते.