घरात गिधाड टांगले…गाण्याप्रमाणेच नवऱ्याने केला पराक्रम, आता खाणार जेलची हवा…
त्र्यंबकेश्वर येथील आंबोली फाट्यावर वन विभागाने बिबट्याच्या कातडीची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यापैकीच एका आरोपीच्या घरी वनविभागाने छापा टाकला होता.
नाशिक : माझ्या हरणीला कारभारणीला भूताने झपाटले हे गाणं (song) अनेकांच्या ओठावर असतं. कारण ते तितकेच प्रसिद्ध गाणं आहे. पण याच गाण्याच्या संबंधित (igatpuri) एक घटना संबंधित आहे. पत्नीला भूताने झपाटले म्हणून थेट पतीने थेट घरातच गिधाडाचे डोके आणि पाय लटकवून ठेवल्याचे वणविभागाच्या अधिकाऱ्यांच्या एका तपासात समोर आले आहे. या घटनेने मात्र नाशिकच्या ग्रामीण (Nashikrural) भागात खळबळ उडाली असून जोरदार चर्चा आहे.
त्र्यंबकेश्वर येथील आंबोली फाट्यावर वन विभागाने बिबट्याच्या कातडीची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली होती.
त्यापैकीच एका आरोपीच्या घरी वन विभागाने छापा टाकला होता. त्यानुसार वणविभागाच्या अधिकाऱ्यांना धक्कादायक माहीती मिळून आली आहे.
संशयित आरोपीच्या घरात बायकोला भूतबाधा झाली म्हणून पूजा मांडण्यात आली होती. त्यानुसार वणविभागाने तपासाची चक्र फिरवली.
तपासा दरम्यान संशयित आरोपीने मात्र बायकोला भूतबाधा झाली म्हणून प्राण्यांची तस्करी केल्याची कबुली दिली.
संशयित दत्तू मौले हा मोखाडा तालुक्यातील चिंचुतारा गावातील रहिवाशी आहे. त्याच्याच घरी ही पूजा मांडण्यात आली होती.
त्याच्या घरी चौकशी दरम्यान गिधाड या प्राण्याचे मुंडके आणि पाय लटकवलेल्या अवस्थेत आढळून आले आहे.
पालघर येथे बिबट्याच्या कातडीची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना माघील आठवड्यात अटक करण्यात आली होती.
या प्रकारावरुन आदिवासी भागात अजूनही अंधश्रद्धेला नागरिक बळी पडत असल्याचे समोर येत आहे.
यापूर्वी देखील आदिवासी भागात असे अघोरी प्रकार केल्याचे उघड झाले आहे. जनजागृतीचा अभाव या नागरिकांमध्ये वारंवार दिसून येतो.
त्यामुळे प्राण्यांच्या तस्करीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात याच भागात होत असल्याचे वनविभागाच्या कारवाईवरुन स्पष्ट होत आहे.