नाशिकः उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाला अक्षरशः अलीबाबाची गुहा सापडली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये एकूण 175 अधिकाऱ्यांनी तब्बल 32 ठिकाणी कारवाई केली. या ठिकाणी सापडलेला पैसा 12 तास मोजला आणि संपत्तीची एकूण मोजणी करायला तब्बल 5 दिवस लागले. येणाऱ्या काळात हे कारवाई सत्र पुन्हा वाढेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे बडे मासे अस्वस्थ झाले असल्याची चर्चा सुरू आहे.
कारवाईबद्दल कुतुहल…
उत्तर महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेली कारवाई सध्या कुतुहलाचा विषय झाली आहे. इतकी मोठी कारवाई तब्बल पाच दिवस चालली. मात्र, त्याची साधी खबरही बाहेर आली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खरे तर तब्बल 175 अधिकाऱ्यांनी एकचावेळी 32 ठिकाणी ही कारवाई केली. त्यामुळे कुणालाही हलचाल करता आली नाही. बडे मासे आपाओप जाळ्यात अडकले. विशेषतः ज्यांच्यानावार या बड्या माशांनी संपत्ती घेऊन ठेवली आहे, त्यांनाही धरल्यामुळे साऱ्या नाड्या एकत्रित आवळल्या गेल्या.
बाहेर पडूच दिले नाही…
नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये आयकरने छापे टाकल्यानंतर घर, कार्यालये सील केले. आतून बाहेर आणि बाहेरून आत कुणालाही प्रवेश दिला नाही. त्यामुळे कोण लोक आलेत, कशासाठी आलेत, याचीही काहीही माहिती कोणालाही नव्हते. शिवाय संपर्काची साधनेही काढून घेतली गेली. त्यामुळे आपल्या शेजारच्या घरात पाहुणे आले असतील, म्हणून इतर शेजारीही शांत होते. मात्र, पाहुणे पाच दिवस राहिले आणि मोठा धमाका करून गेले, अशी अवस्था आता झाली आहे.
गडगंज माया सापडली
आयकर विभागाने केलेल्या कारवाईत जवळपास 240 कोटींची संपत्ती सापडल्याचे समजते आहे. त्यात सहा कोटींची रोकड होती. हा पैसा मोजायला बारा तास लागले. सोबत पाच कोटींचे दागिने सापडले. त्यात मौल्यवान रत्नांच्या अंगठ्या, हिरे अशी मालमत्ता असल्याचे समोर येत आहे. विशेषतः सोन्याच्या बिस्कटांचे प्रमाण मोठे होते. अनेक मोठे मास अजूनही रडावर असून, त्यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या कारवाईने ऐन थंडीत ज्यांनी काळापैसा जमा केलाय त्यांना घाम फोडला आहे.
इतर बातम्याः
#ArrestSunnyLeone | सनी लिओनीला अटक करा! सोशल मीडियावर जोरदार मागणी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
आफ्रिकन व्यक्तीने ‘डान्स मेरी राणी’वर केला हटके डान्स, व्हिडीओ लोकांच्या पसंतीला