VIDEO | कारला धडकून बाईकसह तरुण गेला फरफटत, नाशकात भीषण अपघात, संतप्त जमावाने गाडी पेटवली
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी परिसरातील पारदेवीजवळ बाईक आणि क्रेटा कार यांचा भीषण अपघात झाला. कार आणि बाईक यांची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर बाईकसकट तरुण फरफटत गेला, तर एक जण फेकला गेला.
शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी : नाशिकमध्ये कार आणि बाईक यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. धडक झाल्यानंतर मोटरसायकलसकट तरुण फरफटत गेला, तर एक जण फेकला गेला. अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर संतप्त झालेल्या नागरिकांनी गाडी पेटवून दिली.
काय आहे प्रकरण?
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी परिसरातील पारदेवीजवळ बाईक आणि क्रेटा कार यांचा भीषण अपघात झाला. कार आणि बाईक यांची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर बाईकसकट तरुण फरफटत गेला, तर एक जण फेकला गेला.
नेमकं काय घडलं?
हा अपघात इतका भीषण होता, की अपघातात नाशकातील डाक बंगला परिसरात राहणाऱ्या करण मनोहर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
संतप्त जमावाने गाडी पेटवली
या घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी गाडी पेटवून दिली. या आगीत गाडी जळून खाक झाली आहे.
पाहा व्हिडीओ :
बोरटेंभे ब्रिजजवळ आयशर-पिकअप अपघात
दोनच दिवसांपूर्वी, मुंबई नाशिक महामार्गावर बोरटेंभे ब्रिजजवळ भीषण अपघात झाला होता. आयशर आणि पिकअप गाडी धडकून तिघे जण जखमी झाले. अपघातात पिकअप कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
नेमकं काय घडलं होतं?
पिकअप गाडी आयशर वाहनावर धडकल्यामुळे मोठा अपघात झाला. मुंबई नाशिक महामार्गावर बोरटेंभे ब्रिजजवळ हा अपघात झाला. दोन गाड्यांची धडक झाल्यानंतर जोरदार आवाज झाला. अपघातात पिकअप गाडीचा चुराडा झाला.
जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर
शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून दोघा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना रुट पेट्रोलिंग टीमने वाहतूक पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले. जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
मुंबई नाशिक हायवेवर भीषण अपघात, आयशरवर धडकून पिकअप गाडीचा चक्काचूर
एक टन काचा अंगावर पडून टेम्पो चालकाचा मृत्यू, विचित्र अपघाताने कोल्हापुरात हळहळ
आबांच्या पत्नीमुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचले, आमदार सुमनताई पाटलांची मदतीसाठी तत्परता