फळ विक्रेत्यांच्या भांडणात मध्यस्थी भोवली, नाशकात 31 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला मनोज कुमार प्रभूदयाल कुशवाह येवला शहरात राहत होता. तो हातगाडीवर अननस विक्रीचा व्यवसाय करत होता. दोन दिवसांपूर्वी फळ विक्रेत्यांमध्ये झालेलं भांडण सोडवण्यासाठी तो गेला होता.
नाशिक : दोन फळ विक्रेत्यांच्या भांडणात मध्यस्थी करणं तरुणाला चांगलंच महागात पडलं. 31 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात थर्टी फर्स्टच्या आदल्या दिवशी ही घटना घडली होती. हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला मनोज कुमार प्रभूदयाल कुशवाह येवला शहरात राहत होता. तो हातगाडीवर अननस विक्रीचा व्यवसाय करत होता. दोन दिवसांपूर्वी फळ विक्रेत्यांमध्ये झालेलं भांडण सोडवण्यासाठी तो गेला होता. त्यावेळी आरोपी ब्रिजेश कुमार रमाशंकर कुशवाह याला मनोजचा राग आला आणि त्याने मनोजच्या पाठीत अननस कापण्याच्या धारदार चाकूने वार केले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मनोज कुमारला त्याच्या साथीदारांनी उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दाखल केले, मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हत्येनंतर आरोपी फरार
हत्येची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आली. आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही फळविक्रेते एकाच ठिकाणी राहत होते. रात्रीच्या सुमारास दारु प्यायल्यानंतर दोघांमध्ये तुंबळ भांडणं झाली होती. या घटनेचा अधिक तपास येवला शहर पोलिस करत आहेत.
संबंधित बातम्या :
Nashik Suicide | आई मला माफ कर, सुसाईड नोट लिहित विवाहितेची आत्महत्या
पाचवीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; महिन्यातील दुसरी घटना, नेमके कारण काय?
नाशिकमध्ये बनावट दागिने तारण ठेऊन बँकेला 24 लाखांचा गंडा, चौघांविरोधात गुन्हा दाखल