मांडवलीसाठी नाशिकमध्ये उद्योजकाला मागितली 2 कोटींची खंडणी; भूमाफियाची तुरुंगातून उठाठेव

नाशिकमधल्या खंडणी प्रकरणामुळे उद्योजकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

मांडवलीसाठी नाशिकमध्ये उद्योजकाला मागितली 2 कोटींची खंडणी; भूमाफियाची तुरुंगातून उठाठेव
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 12:43 PM

नाशिकः नाशिकच्या एका बड्या उद्योजकाकडे चक्क 2 कोटींची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे उद्योजनगरी पुन्हा एकदा हादरली आहे. भूमाफिया रम्मी राजपूतच्या नावाने ही खंडणी मागण्यात आली असून, याप्रकरणी रूपेश धीरवाणी, मोहनलाल पहुजाविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लवकर लावावा, दोषींना बेड्या ठोकाव्यात अशी मागणी उद्योगजगतातून होत आहे.

नेमके प्रकरण काय ?

नाशिकमधील उद्योजक ईश्वर लापसीया (रा. सावरकरनगर) यांना ही खंडणी मागण्यात आलीय. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सातपूर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक 68/4 या इंडस्ट्रीज प्लॉटवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रण काढण्यासाठी संशयित रूपेश धीरवाणी, मोहनलाल पहुजा याने लापसीया यांना फोन केला. याप्रकरणाच्या मांडवलीसाठी 2 कोटींची खंडणी मागितली. हे प्रकरण कुख्यात गुन्हेगार रम्मी राजपूतकडे गेले तर महागात पडेल असे म्हणत उद्योजक लापसीया आणि प्लॉट मालक सुरेश शहा यांना ठार मारण्याची धमकी दिली.

मंडलिक खुनातील आरोपी

नाशिकमधील बहुचर्चित अशा आनंदवल्ली भागात वृद्ध शेतकरी रमेश मंडलिक यांचा जमिनीसाठी खून झाला होता. मंडलिक यांच्या खुनाची सुपारी 30 लाख रुपये आणि 10 गुंठे जमिनीला होमगार्ड गणेश काळे आणि आबासाहेब भडांगे यांचा भाचा भगवान चांगले याला दिली होती. मंडलिक हे पाच फेब्रुवारी रोजी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले. तेव्हा त्यांचा गळा चिरून ठार मारण्यात आले. याप्रकरणामागे भूमाफिया रम्मी राजपूतसह त्याचा भाऊ जिम्मी राजपूत, बिल्डर बाळासाहेब कोल्हे आदी वीस जणांची टोळी होती. यातल्याच रम्मी राजपूतने ही खंडणी मागितल्याचे समजते.

रम्मीवर मोक्काची कारवाई

मंडलिक खून प्रकरणात भूमाफिया रम्मी राजपूतवर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांनी सारे राजकीय दबाव झुगारून कुख्यात राजपूत बंधू आणि त्यांच्या टोळीला चक्क परप्रांतात जावून बेड्या ठोकल्या. त्यांच्या या कारवाईचे कौतुकही झाले. आता हाच राजपूत तुरुंगातून सुत्रे हलवत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उद्योजकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

इतर बातम्याः

Sanjay Raut : संसद ते विधानसभा…देवेंद्र फडणवीसांची नरेंद्र मोदींविषयीची ‘ती गर्जना’ अज्ञानाचा अतिरेक, संजय राऊत यांचं रोखठोक वक्तव्य

जीन्सवाल्या पोरींना मोदी आवडत नाहीत, 40 ते 50 वर्षाच्या महिलांवरच पंतप्रधानांचा प्रभाव; दिग्विजय सिंह यांचं वादग्रस्त विधान

Mann Ki Baat: ओमिक्रॉनच्या विरोधात कसं लढायचं?, द्विसूत्री काय?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली ‘मन की बात’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.