धक्कादायक! नाशिक गोळीबार प्रकरण, आरोपीचा पोलिसांवरच आरोप

नाशिक आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधवांवर झालेल्या गोळीबार प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकणातील आरोपीनं चक्क पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. हे संपूर्ण प्रकरण आहे काय? हे आपण जाणून घेऊयात.

धक्कादायक! नाशिक गोळीबार प्रकरण, आरोपीचा पोलिसांवरच आरोप
नाशिक गोळीबार प्रकरण, आरोपीचा पोलिसांवरच आरोप
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 2:20 AM

नाशिकच्या आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. गोळीबार प्रकरणातील आरोपी अंकुश शेवाळेच्या एका व्हिडीओने खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांचं नाव घेण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकल्याचा आरोप आरोपी अंकुश शेवाळेकडून करण्यात आला आहे. 2022 मध्ये नाशकात आरपीआयचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झाला होता. गोळीबारात त्यांच्या पायाला जखम झाली होती. यात एकूण 5 जणांना आरोपी बनवलं गेलं. त्यापैकी काहींना नाशिक पोलिसांनी ४ दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं. त्याचबरोबर सुधाकर बडगूजर यांच्या जवळचे अंकुश शेवाळे यांचीही संशयित म्हणून चौकशी झाली.

सुरुवातीला अंकुश शेवाळे यांनी गोळीबार प्रकरणात बडगुजर यांच्या मुलाचं नाव घेतल्याचं समोर आलं. यानंतर संशयित आरोपीला पोलीस मेडिकलसाठी घेवून गेलेले असताना बडगुजर रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी संशयित आरोपीने पोलिसांवरच गंभीर आरोप केल्याने याप्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला. 2 दिवस पोलिसांनी मारहाण केली, बळजबरीनं नाव घेण्यास भाग पाडल्याचा दावा आरोपीनं केला. गोळीबार प्रकरणात ठाकरे गटाचे बडगुजर आणि त्यांच्या मुलाचं नाव घ्या, असं पोलिसांन सांगितल्याचा आरोप आरोपीकडून करण्यात आला आहे.

राजकारण तापलं

सुधाकर बडगुजर कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यावर टीकास्त्र डागलंय. बडगुजर कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. दरम्यान राऊतांच्या आरोपांनंतर भाजप आमदार नितेश राणेंनी देखील पलटवार केलाय. सुधाकर बडगुजर यांनी संजय राऊतांपासून सावध रहावं, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

प्रशांत जाधवांवर झालेल्या गोळीबारा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजरांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, आरोपीनं पोलिसांवर केलेल्या आरोपानंतर या प्रकरणानं नवं वळण घेतल्याचं दिसतंय.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.