मैत्रिणीचा फेक आयडी बनवून त्रास, संतापलेल्या तरुणांच्या टोळीकडून हत्या, मनमाड रेल्वेस्थानकावर थरार

| Updated on: Nov 06, 2021 | 3:19 PM

सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरु असताना नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये धक्कादायक घटना घडलीय. मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची हत्या करुन चार ते पाच तरुण फरार झाले आहेत.

मैत्रिणीचा फेक आयडी बनवून त्रास, संतापलेल्या तरुणांच्या टोळीकडून हत्या, मनमाड रेल्वेस्थानकावर थरार
मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
Follow us on

रईस बाबू शेख टीव्ही 9 मराठी, मनमाड, नाशिक: सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरु असताना नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये धक्कादायक घटना घडलीय. मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची हत्या करुन चार ते पाच तरुण फरार झाले आहेत. मैत्रिणीला फेक आयडी बनवून त्रास दिल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी फरार झाले असून रेल्वे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे. पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतंर अधिक माहिती देणार आहेत.

चार ते पाच जणांच्या टोळीकडून हत्या

मनमाड-चार ते पाच जणांच्या टोळीने तरुणाची निर्घृणपणे हत्या केली.मनमाड रेल्वे स्थानकावर ही खळबळजनक घटना घडलीय. शिवम पवार असे हत्त्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हत्येचं कारण काय?

मनमाड पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत शिवराम पवार मैत्रिणीची फेक आयडी बनवून तिला त्रास देत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या इतर 4 ते 5 तरुणांनी चाकूने वार करून हत्या केली.

आरोपी फरार

मनमाड रेल्वे स्थानकावर तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. आरोपींनी रेल्वे स्थानकावर शिवराम पवार या तरुणावर चाकूनं वार केले. शिवराम पवार याचा खून करुन चार ते पाच तरुण फरार झाले असून पोलिसांकडून या प्रकरणी घटनास्थळावर पंचनामा करण्यात आला आहे.

पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु

शिवराम पवार या तरुणाची हत्त्या केल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

कधी घडली घटना?

मनमाड रेल्वे स्थानकावर शिवराम पवार याच्यावर खूनी हल्ला मध्यरात्री 12 ते 1 च्यादरम्यान करण्यात आला आहे. रेल्वे पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

इतर बातम्या:

रेल्वेकडून मेगाब्लॉक जाहीर, हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार, वाचा संपूर्ण यादी

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीचा अखेरचा दिवस, जामीन मिळणार का? राज्याचं लक्ष

 

Nashik Manmad youth murder by four or five persons by knife at Manmad Railway Station