POCSO| एकतर्फी प्रेम भोवले; तरुणाला जेलमध्ये 3 वर्षे खडी फोडावी लागणार, नेमके प्रकरण काय?
अॅड. दीपशिखा भिडे यांनी पीडितेची बाजू मांडली. त्यांनी 7 साक्षीदार तपासले. या पुराव्याच्या आधारे शेवटी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी भूषण जाधवला 3 वर्षे सक्तमजुरी आणि 2 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
नाशिकः प्रेमात (love) माणूस अंधळा होता. अनेकदा अनेकांची सद्सदविवेकबुद्धीही हरवते. त्यामुळे अशी माणसे या विकृत प्रेमाच्या नावाखाली समोरच्या व्यक्तीला त्रास द्यायला सुरुवात करतात. त्यातून अनेकजण हिंसक होतात. कोठे एकतर्फी प्रेमातून चाकूहल्ला झाल्याचे आपण पाहतो, तर अनेकजण समोरच्या व्यक्तीवर अॅसिडहल्ला करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. मात्र, असे पाऊल विसरताना अशा व्यक्तींना आपण प्रेमाच्या नावाखाली काय करतोय, याची जाण सुद्धा नसते. प्रेमात आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला कसलाही मानसिक सुद्धा त्रास होऊ नये, इतकी काळजी असते. मात्र, अशा प्रेमाला प्रेम तरी कसे म्हणायचे, असा प्रश्न उपस्थित होतो. नाशिकच्या अशाच एका तरुणाला याची चांगलीच अद्दल घडली आणि त्याला आता चक्क तुरुंगात खडी फोडावी लागणार आहे.
नेमके प्रकरण काय?
नाशिकमध्ये ही 2015 साली घडलेली घटना. भूषण जाधव (वय 20, रा. कळवण) याचे एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. या प्रेमापायी तो अनेकदा या मुलीचा पाठलाग करायचा. तिच्याविषयी वेगवेगळे कमेंट पास करायचा. हे बऱ्याच दिवस चालले. मात्र, मुलीने हे सारे घरात सांगितले नाही. आपली शाळा बंद होण्यापासून ते प्रकरण विनाकारण वाढेल, अशी भीती तिला होती. मात्र, एका दिवशी भूषणणे टोकाचे पाऊल उचलले. त्याने तमाशाच असा केला की, हे प्रकरण आपोआप घरातील व्यक्तींना समजले.
आई-वडिलांना मारहाण
पीडित मुलगी एका लग्नाला गेली होती. तिथे सारे नातेवाईक आणि इतर मैत्रिणी लग्नात नाचल्या. त्यामुळे पीडिताही या लग्नात नाचली. याचा भूषणला राग आला. त्याने तिला मोबाईलवर फोन करून वारंवार धमक्या दिल्या. शिवाय पीडितेच्या घरात घुसून तिचा विनभंग केला. शिव्या दिल्या. तर दुसऱ्या संशयित आरोपींनी त्याला फूस देत पीडितेने आरोपीला भेटावे, बोलावे म्हणून दबाव टाकला. इतकेच नाही, तर पीडितेच्या आई-वडिलांना त्यांनी मारहाण केली. त्यामुळे हे प्रकरण चिघळले.
7 साक्षीदार तपासले
भूषणचा वाढता त्रास पाहून पीडितेच्या आई-वडिलांनी कळवण पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे भूषणसह त्याच्या 7 साथीदारांविरोधात पोक्सो व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास केला. दोषारोपपत्र सादर केले. यावेळी अॅड. दीपशिखा भिडे यांनी पीडितेची बाजू मांडली. त्यांनी 7 साक्षीदार तपासले. या पुराव्याच्या आधारे शेवटी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी भूषण जाधवला 3 वर्षे सक्तमजुरी आणि 2 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
इतर बातम्याः
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली