नाशिकमध्ये ‘मुन्नाभाई’ स्टाईल कॉपी, उमेदवार कुणीतरी, परीक्षा देणारा दुसराच, तर उत्तर पुरवणारा तिसरा

नाशिकमध्ये एक विचित्रप्रकार समोर आला आहे. 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटाच्या कथेत ज्याप्रकारे कॉपी करण्याचा प्रकार दाखविला होता, अगदी तसाच प्रकार नाशिकमध्ये घडलाय. औरंगाबादच्या या मुन्नाभाईला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नाशिकमध्ये 'मुन्नाभाई' स्टाईल कॉपी, उमेदवार कुणीतरी, परीक्षा देणारा दुसराच, तर उत्तर पुरवणारा तिसरा
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 10:20 PM

नाशिक : सरकारी नोकरी मिळावी यासाठी प्रत्येक तरुण प्रयत्न करत असतो. आजच्या घडीला सरकारी नोकरी किती महत्त्वाची आहे हे शब्दांत सांगणं कठीण आहे. कारण रोजगाराच्या संधी फार कमी झाल्या आहेत. तसेच सरकारी नोकरीसाठी खूप स्पर्धा आहे. अवघ्या 100 जागांसाठीदेखील लाखो तरुण अर्ज दाखल करतात. त्यामुळे परीक्षा तितकीच आव्हानात्मक बनली आहे. अशा परिस्थितीत खूप अभ्यास करुन सर्वाधिक गुण मिळवून मेरीटमध्ये आपलं नाव मिळवणं हाच तरुणांपुढे एकमेव मार्ग आहे. पण काहीजण शॉर्टकर्ट पर्याय निवडण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबतात. पण तो मार्ग त्यांना चुकीच्याच ठिकाणी घेऊन जाऊ शकतो हे नाशिकमधील घटनेने दाखवून दिलं आहे.

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाच्या कथेत ज्याप्रकारे कॉपी करण्याचा प्रकार दाखविला होता, अगदी तसाच प्रकार नाशिकमध्ये घडलाय. औरंगाबादच्या या मुन्नाभाईला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लिपिक आणि इतर पदांच्या भरतीसाठी नाशिकमध्ये रविवारी लेखी परीक्षा पार पडली. या परीक्षेचा पेपर नाशिकच्या केंद्रावर फुटल्याची घटना घडली होती. बटन कॅमेरा आणि ब्लुटूथ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा गैरप्रकार केल्याचा संशय परीक्षा केंद्रावर उघडकीस आला.

नेमका प्रकार काय?

परीक्षा देणारा मूळ उमेदवार, त्याच्या जागी परीक्षा देणारा डमी परीक्षार्थी आणि उत्तर पुरवणारा वेगळा, अशा तीन संशयितांविरोधात नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक रोड येथील आर्टिलरी सेंटर भागातील फ्युचर टेक सोल्युशन केंद्रावर ही परीक्षा सुरू होती.

हे सुद्धा वाचा

अर्जुन मेहेर या परीक्षार्थीच्या जागेवर राहूल नागलोथ या डमी उमेदवाराने परीक्षा दिली. त्याने बटन कॅमेरा आणि ब्लूटूथच्या साहाय्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो बाहेर पाठवला. तर केंद्राबाहेर उभ्या असलेल्या अर्जुन राजपूत याने प्रश्नांची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी राजपूत आणि नागलोथ याला ताब्यात घेतलं आहे. उपनगर पोलीस ठाणे याप्रकरणी पुढील चौकशी करत आहेत. परीक्षेचे हे रॅकेट अजून मोठे असल्याचा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. लिपिक पदाच्या परीक्षेसाठी आलेल्या सर्व परीक्षार्थींची चौकशी करण्यात येत आहे.

आणखी किती जणांवर कारवाई होणार?

संबंधित प्रकरणात आणखी किती जणांना अटक होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अशा प्रकारचं कृत्य करणारं मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. पोलीस या रॅकेटची बांधणी करणाऱ्यांपर्यंत खरंच पोहोचतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पोलिसांना संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आलं तर अशाप्रकारचे गैरप्रकारच्या घटनांना निश्चितच आळा बसू शकणार आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.