नाशिकमध्ये बाप्पांच्या विसर्जनाला गालबोट; मूर्ती संकलन करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एक ठार

नाशिकमध्ये (Nashik) महापालिकेच्या (Municipal Corporation) गणेश मूर्ती संकलित करणाऱ्या ट्रकने धडक (truck accident) दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे बाप्पांच्या विसर्जनास गालबोट लागले.

नाशिकमध्ये बाप्पांच्या विसर्जनाला गालबोट; मूर्ती संकलन करणाऱ्या ट्रकच्या धडकेत एक ठार
अंबरनाथमध्ये भरधाव बसची दुचाकीस्वाराला धडक
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 12:49 PM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) महापालिकेच्या (Municipal Corporation) गणेश मूर्ती संकलित करणाऱ्या ट्रकने धडक (truck accident) दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे बाप्पांच्या विसर्जनास गालबोट लागले. (One dies in truck accident, incident while collecting Ganesh idol)

गणेश विसर्जनासाठी महापालिकेने ठिकठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण केले होते. पंचवटी आणि रामकुंड परिसरातही अशा तलावांची निर्मिती करण्यात आली होती. पंचवटीतील गोदा घाटाजवळ असणाऱ्या म्हसोबा महाराज पटांगणावर गणेश मूर्तीचे संकलन सुरू होते. यावेळी मूर्ती संकलित करणाऱ्या ट्रकने (एम. एच. 15 8129) सकाळी आठच्या सुमारास एका व्यक्तीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सख्खे भाऊ ठार

दारूचे व्यसन सोडविण्यासाठी गेलेले सख्खे तरुण भाऊ अपघातात ठार झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंटजवळ घडली आहे. गोरख लक्ष्मण जाधव (वय 35) सोमनाथ लक्ष्मण जाधव भाऊ (वय 25) अशी मृतांची नावे आहेत. इगतपुरी तालुक्यातील मुरंबीत गोरख जाधव रहायचे. त्यांचा लहान भाऊ सोमनाथला दारूचे व्यसन होते. त्यामुळे गोरख हे सोमनाथ यांना दारूचे व्यसन सोडविण्यासाठी वणी येथे दुचाकीवरून घेऊन गेले होते. वणी येथे औषधोपचार करून ते गावाकडे निघाले. तेव्हा परतीच्या प्रवासात मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंटजवळील उड्डाण पुलावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविले. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

रानवड शिवारात चारचाकीने उडवले

नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रात्री आठच्या सुमारास रानवडहून पिंपळगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका मोटारसायकलला (एम.एच. 15 जी. एन. 1118) पाठीमागून धडक दिली. त्यात मोटारसायकलवरील आकाश सोमनाथ गिते (वय 24, रा. पालखेड) यांचा जागीच मृत्यू झाला. आकाश यांचे डोके, तोंड, दोन्ही हात व उजव्या पायास गंभीर जखमा झाल्या होत्या. अपघातानंतर वाहनचालकाने वाहन घेऊन पोबारा केला.

पिकअपने दिली धडक

पिंपळगावहून रानवडे जाणाऱ्या पिकअप गाडीच्या (एम. एच. 15 बी. 2659) चालकाने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला (एम. एच. 15 एफ. ए. 9773) जोरदार धडक दिली. यात घटनेत मोटारसायकलवरील संदीप शिवराम रसाळ (वय 32, रा. आहेरगाव) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (One dies in truck accident, incident while collecting Ganesh idol)

इतर बातम्याः

नाशिक पुन्हा गॅसवर; कोरोना रुग्णांत वाढ, हजाराचा टप्पा ओलांडला

धुळ्यात कापूस खरेदी सुरू, पण पितृपक्षानंतर आणण्याचे आवाहन

नाशिकः प्रदूषण मुक्ततेची दीक्षा देऊन बाप्पा गेले गावाला; रुखरुख लागे जीवाला!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.