रेल्वेतून पडून कर अधिकारी ठार; नाशिकमध्ये वेगवेगळ्या घटनांत पाच जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात रेल्वेतून पडून वस्तू व सेवा कर अधिकारी ठार झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांतून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रेल्वेतून पडून कर अधिकारी ठार; नाशिकमध्ये वेगवेगळ्या घटनांत पाच जणांचा मृत्यू
दत्तू भांडेकर, वस्तू व सेवा कर अधिकारी
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 3:00 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यात रेल्वेतून पडून वस्तू व सेवा कर अधिकारी ठार झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांतून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Tax officer killed after falling from train; Five people died in different incidents)

वस्तू व सेवा कर अधिकाऱ्याचा मृत्यू

मुंबई ते मनमाड भुसावळकडे जाणाऱ्या मध्य रेल्वे लाइनवर रेल्वेतून पडून तरुण कर अधिकाऱ्याचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. दत्त रामदास भांडेकर (वय 31) असे त्यांचे नाव आहे. चांदवड तालुक्यातील काळखोडे शिवारात ही घटना घडली. भांडेकर हे ठाणे जिल्ह्यातल्या भाईंदरचे होते. ते वस्तू व सेवा कर विभागात कार्यरत होते. सकाळी सहा वाजता धावत्या रेल्वेतून ते पडल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, हा घातपात आहे की, अपघाती मृत्यू याचा तपास सुरू केला आहे.

माजी पंचायत समिती सदस्याची आत्महत्या

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर पंचायत समितीचे सदस्य दिलीप कचेश्वर (वय 53) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून ते पोटदुखीच्या त्रासाने त्रस्त होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सरदवाडी धरणाच्या बाजूला असलेल्या टेकडीवरील झाडाला त्यांनी गळफास घेतला. पंचायत समिती सदस्य असताना त्यांनी अनेक सभा गाजवल्या. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पंचायत समितीचे उपसभापती संग्राम कातकाडे यांचे ते काका होत.

कालव्यात बुडून तरुण ठार

नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी शहरातील तरुणाचा पालखेड कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश गुंबाडे (वय 22) असे मृत तरुणाचे नाव आहे. गणेश चिंचखेडच्या आथरे वस्तीत शेती करायचा. त्याने शेतीतल्या टोमॅटोवर फवारणी केली. त्यानंतर पालखेड कालव्याच्या पाण्यात अंघोसीसाठी उतरला. पोहत येताना त्याला लोखंडी रॉडचा धक्का लागला. त्यामुळे पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला.

साप चावल्याने महिलेचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या उजनी येथे साप चावल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. कलावती प्रभाकर जगताप असे त्यांचे नाव आहे. कलावती या घरकाम आटोपून शेतात गेल्या होत्या. तिथे त्या काम करताना असताना विषारी सापाने त्यांना चावा घेतला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दुचाकी अपघातात एक ठार

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील पाटणे शिवारात दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाला. राजाराम दामू शेवाळे (वय 55) असे मृताचे नाव आहे. ते टेहरे गावचे रहिवासी होती. याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Tax officer killed after falling from train; Five people died in different incidents)

इतर बातम्याः

चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर दोघांचा बलात्कार; नाशिकजवळची औंढेवाडी हादरली, एक आरोपी अल्पवयीन

Nashik Rain | नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, सराफ बाजारही पाण्याखाली जाण्याची भीती

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.