आईवर संशय घेणाऱ्या जन्मदात्या बापाचा दोन मुलांनी पोलिसासमोर भर रस्त्यात केला खून

जळगाव (Jalgaon) सलग दोन दिवस झालेल्या खुनाच्या दोन घटनांनी (Two murder) हादरले आहे. त्यात एका घटनेत आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या जन्मदात्या बापाचा दोन मुलांनी पोलिसासमोर भर रस्त्यात खून (children killed father) केल्याची घटना घडली. दुसऱ्या घटनेत एका सुरक्षारक्षकाचा डोक्यात वार करून खून केल्याचे उघड झाले आहे.

आईवर संशय घेणाऱ्या जन्मदात्या बापाचा दोन मुलांनी पोलिसासमोर भर रस्त्यात केला खून
जळगाव दोन खुनांनी हादरले.
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 1:28 PM

नाशिकः जळगाव (Jalgaon) सलग दोन दिवस झालेल्या खुनाच्या दोन घटनांनी (Two murder) हादरले आहे. त्यात एका घटनेत आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या जन्मदात्या बापाचा दोन मुलांनी पोलिसासमोर भर रस्त्यात खून (children killed father) केल्याची घटना घडली. प्रेमसिंग राठोड असे मृताचे नाव असून, दीपक राठोड, गोपाळ राठोड अशी मुलांची नावे आहेत. दुसऱ्या घटनेत एका सुरक्षारक्षकाचा डोक्यात वार करून खून केल्याचे उघड झाले आहे. (Two murders in Jalgaon: The children killed their father on the street in front of the police)

जळगाव शहर एका पोठापाठ एक झालेल्या दोन खुनांच्या घटनांनी अक्षरशः हादरून गेले आहे. यातली पहिली घटना निमखेडी रस्त्यावर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. प्रेमसिंग राठोड हे नेहमी पत्नी बसंतीबाईच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे. त्यांना दीपक, गोपाळ, कविता, शिवाणी ही चार मुले आहेत. प्रेमसिंग यांच्या कानाची शस्त्रक्रिया करायची होती. त्यासाठी त्यांनी दीपक आणि गोपाळ या मुलांसोबत पत्नी बसंतीबाईलाही शासकीय रुग्णालयात घेण्यास सांगितले. वडिलांनी आपल्या आईच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने मुलांचा राग अनावर झाला. त्यांनी त्यांना घरातच मारहाण करायला सुरुवात केली. मात्र, प्रेमसिंग यांनी पळत जावून घरातून चाकू आणला. त्यांनी गोपाळवर हल्ला करायचा प्रयत्न केला. गोपाळने चाकू हिसकावून घेतला. या झटापटीत वाद टोकाला गेला. गोपाळने वडिलांची छाती, पोट आणि पायावर सपासप वार करणे सुरू केले. दीपकने काठीने मारहाण सुरू केली. त्यामुळे रक्तबंबाळ झालेले प्रेमसिंग रस्त्यावरून पळत सुटले. गोपाळने त्यांचा पाठलाग करून पुन्हा वार केले. ही घटना पोलिस स्टेशनचे कर्मचारी श्याम बोरसे यांनी ड्युटीवर जाताना पाहिली. त्यांनी तात्काळ मुलांकडे धाव घेत त्यांना बेड्या ठोकल्या. मोबाइलवरून फोन करून माहिती देत ठाण्यातून पथक बोलावून घेतले.

झोपलेल्या सुरक्षारक्षकाच्या डोक्यात वार

जळगावमध्ये सोमवारी दुसरा खून झाला. या घटनेत एका सुरक्षारक्षकाच्या डोक्यात वार करून त्यांना ठार करण्यात आले. राजू सोनवणे असे मृताचे नाव आहे. शहरातील रामपेठमधील आंबेडकर नगरात ही घटना घडली. सोनवणे कुटुंबात वडिलोपार्जित घर विकण्यावरून वाद सुरू आहे. त्यातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मारेकऱ्याने झोपेत असलेल्या राजू सोनवणे यांच्या डोक्यात सलग वार केले. त्यामुळे त्यांना प्रतिकाराचीही संधी मिळाली नाही. त्यांचा झोपेतच मृत्यू झाला. त्यांच्या बनियवर, पलंगाच्या बाजूच्या भिंतीवर रक्ताचे डाग व शिंतोडे उडाल्याचे आढळले. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांचा तपास सुरू केला आहे. (Two murders in Jalgaon: The children killed their father on the street in front of the police)

इतर बातम्याः 

नाशिक जिल्ह्यातील 12 धरणांतून विसर्ग; औरंगाबादला मोठा दिलासा, 8.14 टीएमसी पाणी जायकवाडीकडे

मालेगावचे ‘एमआयएम’चे आमदार म्हणतायत, ‘जीवाला धोका’; पोलिसात तक्रार

Nashikweather: नाशिक जिल्हा, खान्देशात पाऊस आजही जोरदार बॅटींग करण्याची शक्यता

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.