चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर दोघांचा बलात्कार; नाशिकजवळची औंढेवाडी हादरली, एक आरोपी अल्पवयीन

चौथीत शिकणाऱ्या अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना सिन्नर तालुक्यातल्या (जि. नाशिक) औंढेवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपीमध्ये एक सोळा वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे.

चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर दोघांचा बलात्कार; नाशिकजवळची औंढेवाडी हादरली, एक आरोपी अल्पवयीन
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 12:54 PM

नाशिकः चौथीत शिकणाऱ्या अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना सिन्नर तालुक्यातल्या (जि. नाशिक) औंढेवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपीमध्ये एक सोळा वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे. (Two rape a nine-year-old girl; Incident at Aundhewadi near Nashik, two arrested)

या भयंकर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या शेतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे मुलीचे आई-वडील तिला घरात ठेवून शेतात कामाला जात असत. मुलगी घरात एकटी असते, यावर नजर ठेवून गणेश ऊर्फ शंकर निवृत्ती कुंदे (वय 43, रा. औंढेवाडी) याने मुलीवर बलात्कार केला. तिच्या राहत्या घरी शेतात नेऊन हा अत्याचार केला. अत्याचार केल्याची माहिती कुणाला सांगितल्या कुटुंबाला ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यानंतर एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलानेही मुलीवर जवळपास तीन वेळा अत्याचार केला. त्यामुळे मुलीच्या पोटात दुखू लागले. हा त्रास असह्य झाल्याने तिने आई-वडिलांना सांगितले. आई-वडिलांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याचे समजले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तातडीने दोघांविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अल्पवयीन संशयितासह गणेश कुंदेला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी करत आहेत.

चाकूचा धाक दाखवून अत्याचार नाशिकमध्ये पवननगर भागात एका व्यावसायिक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. या भागात पीडित महिलेचं ब्यूटी पार्लर आहे. महिला आपल्या पार्लरमध्ये पूजा करत असताना आरोपी तिच्या दुकानात घुसला होता. त्यानंतर आतून दरवाजा लावून आरोपीने तिला चाकूचा धाक दाखवला. महिलेच्या तोंडात बोळा कोंबून, तिचे हात बांधून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

24 वर्षीय तरुणीवर बलात्कार दुसरीकडे, 24 वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करुन ती गरोदर राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना उत्तर नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बलात्कार पीडितेने आपल्या घरीच स्वत:चा गर्भपात केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. (Two rape a nine-year-old girl; Incident at Aundhewadi near Nashik, two arrested)

इतर बातम्याः

भिंत खचली, चूल विझलीः नाशिक जिल्ह्यात हाहाकार, दोघांचा बुडून मृत्यू; 3 हजार हेक्टरवरले पीक आडवे, गोदावरीला येणार महापूर

द्राक्ष बागायतदारांना धाकधूक; 15 दिवस बेमोसमी पाऊस नको, अन्यथा तोंडाशी आलेला घास हिरावणार!

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.