Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Helmet Compulsory|विनाहेल्मेट प्रवेश दिल्याने प्राचार्य, मालमत्ता अधिकाऱ्यांवर गुन्हा; नाशिकमध्ये धडक कारवाई!

शेवटचा उपाय म्हणून नाशिक शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये आता विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही. तसे आदेशच पोलीस आयुक्तांनी काढले आहेत. आता कडक कारवाई सुरू झाली आहे.

Helmet Compulsory|विनाहेल्मेट प्रवेश दिल्याने प्राचार्य, मालमत्ता अधिकाऱ्यांवर गुन्हा; नाशिकमध्ये धडक कारवाई!
हेल्मेट वापर
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 12:40 PM

नाशिकः नाशिकमध्ये पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी अतिशय कडक हेल्मेटसक्ती सुरू केली आहे. महाविद्यालयात आणि कार्यालयात विनाहेल्मेट प्रवेश दिल्याप्रकरणी एक प्राचार्य आणि मालमत्ता अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर प्रशासकीय आणि निमप्रशासकीय कार्यालयांच्या प्रमुखांचे धाबे दणाणले आहे. येथून पुढे आधी कार्यालय प्रमुखांवर आणि नंतर दुचाकी चालकावर कारवाई होणार आहे. त्यामुळे अनेक कार्यालयांनी हेल्मेट सक्ती केल्याचे दिसून येत आहे.

अपघातांमुळे कठोर निर्णय

नाशिकमध्ये ऑगस्ट महिन्यात नऊ दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वातंत्र्यदिनापासून शहरातील सर्व पेट्रोल पंपावर नो हेल्मेट, नो पट्रोल मोहीम सुरू केली. त्यानंतर दुचाकीस्वारांचे समुपदेशन सुरू केले. त्यांची परीक्षाही घेण्यात आली. शेवटचा उपाय म्हणून नाशिक शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये आता विनाहेल्मेट प्रवेश दिला जाणार नाही. तसे आदेशच त्यांनी काढले आहेत. 8 नोव्हेंबरपासून हे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर आता कडक कारवाई सुरू झाली आहे.

काय आहेत आदेश?

दुचाकीचालकाने हेल्मेट घातले नाही आणि अशा व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिल्यास तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 (ब) (1) नुसार बाराशे रुपयांचा दंड किंवा आठ दिवसांचा तुरुंगावास भोगावा लागेल. अथवा गरज पडल्यास दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगाव्या लागतील, असे पोलीस आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. विशेष म्हणजे सर्व आस्थापना प्रमुखांना वाहनतळ आणि प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे. पोलिसांचे भरारी पथक वेळोवेळी या भागात पाहणी करणार आहे.

यांच्यावर गु्न्हे दाखल

पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर अनेक कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकी चालकांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळेच दंत महाविद्यालयाचे मालमत्ता अधिकारी अशोक हिरे आणि एचपीटी कॉलेजचे प्राचार्य प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी यांच्याविरोधात पोलीस अधिनियम कलम 131 ब (1) अन्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात ही कारवाई तीव्र करण्यात येणार असून, सर्वांनी हेल्मेट घालावे, नियम पाळावे, असे आवाहन नाशिक पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

Nashik| सामाजिक कार्यकर्त्या, महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्ष साधना तोरणे यांचे निधन

Video| पुन्हा अवकाळी तडाखा, शेतकऱ्यांना हुंदके अनावर; उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भाला इशारा

Nashik|नाशिक जिल्ह्यात 72935 नागरिकांना मिळणार हक्काचं घर, काय आहे योजना?

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.