महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ‘ती’ चूक करू नका, पोलिसांनी स्पष्टच सांगितलं होईल मोठी कारवाई, इशारा काय?

महापुरुषांची जयंती साजरी करत असताना अनेकदा वर्गणी गोळा केली जाते, पण वर्गणी गोळा करत असताना 'ती' चूक केली तर पोलीस थेट तुमच्यावर कारवाई करू शकतात.

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त 'ती' चूक करू नका, पोलिसांनी स्पष्टच सांगितलं होईल मोठी कारवाई, इशारा काय?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 4:45 PM

नाशिक : महाराष्ट्र राज्य हे महापुरुषांचं आणि साधुसंतांचं असल्याचं अनेकदा सांगितलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या जल्लोषात साजरा केला जातात. विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. डीजे डॉल्बीच्या तालावर तरुणाईचा जल्लोषही बघायला मिळत असतो. अनेक ठिकाणी व्याख्यान आणि समाजप्रबोधनपर कार्यक्रमही केले जातात. हेच कार्यक्रम करत असताना वर्गणी गोळा केली जाते. त्यासाठी पावती पुस्तक छापून अनेक जण सक्तीने वसुली करत असतात. त्यावरून बऱ्याच ठिकाणी वादही होतात. मात्र, पोलिसांपर्यंत हे वाद न पोहोचता सामंज्यसपणाने वाद मिटवले जातात. त्यामुळे कारवाई शक्यतो टळली जाते. हीच बाब नाशिक पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर आता पोलिसांनी गंभीर इशारा दिला आहे.

दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठिकठिकाणी वर्गणी गोळा केली जाते आहे. मात्र, वर्गणी गोळा करत असताना जयंती साजरी करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून सक्तीने वर्गणी वसूल केली जात असल्याच्या काही तक्रारी पोलिसांच्या कानावर पडल्या आहेत.

सक्तीने वर्गणी वसूल करत असताना कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये वादही झाल्याचे समोर आला आहे. मात्र, सक्तीच्या वर्गणी वसूलीचा वाद तिथेच मिटवण्यात आला पोलीस ठाण्यापर्यंत हा वाद पोहोचला नाही.

हे सुद्धा वाचा

नुकत्याच पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीत याबाबतची माहिती दिलीआहे. जर सक्तीने वर्गणी गोळा केली तर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल, अशा इशाराच ग्रामीण पोलीस दलाचे विभागीय पोलीस अधीक्षक सोमनाथ तांबे यांनी दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती आणि रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत विविध जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी सहभागी झालेले होते. याच दरम्यान यात्रा साजरा करणाऱ्या कमिट्याही या बैठकीत सहभागी झाल्या होत्या.

इच्छेविरुद्ध वर्गणी गोळा केली तर तो कायदेशीर दृष्ट्या खंडणीचा गुन्हा होऊ शकतो याबाबतची माहिती ग्रामीण पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली आहे. त्यामुळे ही चूक जर कुणाकडून झाली तर त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी भूमिका नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.